Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Old Pension Scheme ] : दि.01 नोव्हेंबर 2005 पुर्वी पदभरती जाहीरात / अधिसुचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दिनांक 01 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर रुजु झालेल्या अधिकारी / कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती ( Old Pension ) योजना लागु करणेबाबत , जिल्हा परिषद नाशिक शिक्षण विभाग ( प्राथमिक ) मार्फत दिनांक 14 फेब्रुवारी 2024 अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
वित्त विभागाकडील शासन निर्णय क्र.संकीर्ण 2023/ प्र.क्र.46/सेवा 4 मंत्रालय मुंबई दिनांक 02 फेब्रुवारी 2024 रोजीच्या संदर्भाधिन निर्णयानुसाार , दिनांक 01 नोव्हेंबर 2005 पुर्वी पदभरती जाहीरात /अधिसूचना निर्गमित करण्यात आलेल्या प्रकरणी शासन सेवेत दिनांक 01 नोव्हेंबर 2005 रोजी अथवा त्यानंतर रुजु झालेल्या शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना केंद्र शासनांच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागु करण्यात आली आहे .
संबंधित अधिकारी / कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागु करण्यात आलेली आहे , संबंधित अधिकारी / कर्मचारी यांनी जुनी निवृत्ती वेतन व त्या अनुषंगिक नियम लागु करण्याचा पर्याय हा सदर शासन निर्णय निर्गमित केल्याचा दिनांकापासून सहा महिन्याच्या कालावधीमध्ये देणे बंधनकारक असल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत .
जे राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी या सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये जुनी निवृत्ती वेतन योजना ( Old Pension ) लागु करण्याचा पर्याय देणार नाहीत , त्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली ( NPS ) लागु असेल . सदरच्या निर्णयाच्या अनुषंगाने ज्या कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन लागु करण्याचा पर्याय दिला असेल , अशा कर्मचारी यांचे प्रस्ताव खालील प्रमाणे कागदपत्रांची पुर्तता करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
01.जुनी पेन्शन योजना लागु करण्याबाबतचा विनंती अर्ज
02.विकल्प अर्ज
03.जि.प……………….जाहिरातीची छायांकित प्रत
04.प्रथम नियुक्ती आदेश छायांकित प्रत
05.शाळा प्राप्त / रुजु आदेश छायांकित प्रत
06.सेवा पुस्तकातील पहिल्या पानाची छायांकित प्रत
07.NPS खाते क्रमांक छायांकित प्रत
या संदर्भातील नाशिक जिल्हा परिषदेकडून निर्गमित करण्यात आलेला सविस्तर परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.