Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee OPS Scheme ] : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत राज्य शासनांकडून गठीत अभ्यास समितीने मागील आठवड्यांमध्ये आपला अहवाल सादर केला असल्याचे मा.मुख्यमंत्री यांनी अधिवेशात सांगितले आहेत . यावर राज्याचे मुख्य सचिव , उपसचिव वित्त विभागा मार्फत अभ्यास सुरु असल्याचे सांगण्यात आले आहेत .
तर आगामी राज्याचे अर्थसंकल्पामध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे पेन्शन योजना लागु करणेबाबत अधिकृत्त घोषणा करण्यात येणार असल्याचे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशन दरम्यान दिले आहेत .या आश्वासनांमुळे राज्यातील कर्मचाऱ्यांनी दिनांक 14 डिसेंबर पासूनचा संप मागे घेतला आहे .म्हणजे परत एकदा राज्य कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यांची वाट पाहवी लागणार आहे .
यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस पत्रकारांशी बोलताना सांगितले कि , जुनी पेन्शन बाबत केंद्र सरकारकडून गठीत समितीच्या अहवालानुसार केंद्र सरकारकडून निर्णय घेतल्यानंतर , राज्य शासनांकडून केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना नविन पेन्शन प्रणाली लागु करण्यात येईल .यावरुन देखिल स्पष्ट होते कि , केंद्र सरकारने NPS मध्ये बदल केल्यास राज्यातील पेन्शन प्रणालीमध्ये बदल केला जाईल .जर केंद्र सरकारकडून केंद्रीय बजेटमध्ये पेन्शन प्रणालीमध्ये सुधारणा न केल्यास , राज्य शासनांकडून गठीत समितीच्या अहवालानुसार पेन्शन प्रणाली लागु केली जाईल .
मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकारकडून गठीत अभ्यास समितीने , कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधीनुसार पेन्शन प्रणाली लागु केली जाईल . म्हणजेच सेवा कालावधीनुसार सेवानिवृत्तीच्या वेळी मिळणाऱ्या मुळ वेतनाच्या 35 टक्के , 40 टक्के , 50 टक्के रक्कम सेवानिवृत्तीनंतर पेन्शन म्हणून देण्यात येईल .
म्हणजेच ज्या कर्मचाऱ्यांच्या सेवा 30 वर्षांच्या पुढे होईल त्यानां 50 टक्के , 20 वर्षे ते 30 वर्षे सेवा करीता 40 टक्के तर 20 वर्षे त्यापेक्षा कमी होईल त्यांना 35 टक्के पेन्शन अशा स्वरुपात पेन्शन अदा केली जाईल , यावर महागाई भत्याचे प्रयोजन केल्यास कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर जुनी पेन्शन प्रमाणे चांगली पेन्शन मिळेल . जी कि राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना ( NPS ) पेक्षा अधिक असणार आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.