Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Old Pension Scheme Gr ] : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दिनांक 02 मे 2024 रोजी वित्त विभांगाकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयानुसार , राज्यातील शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा ( निवृत्तीवेतन ) नियम , 1982 लागु करताना अवलंबावयाची कार्यपद्धती विशद करण्यात आलेले आहेत .
राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून 02.02.2024 रोजीच्या निर्णयानुसार दिनांक 01.11.2005 पुर्वी पदभरती जाहीरात / अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दिनांक 01.11.2005 रोजी अथवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवा ( निवृत्ती वेतन ) नियम , 1982 निवृत्तीवेतनाचे अंशराशीकरण नियम 1984 व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधीच्या तरतुदी लागु करण्यात आल्या आहेत .
त्यानुसार जे राज्य शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांनी जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबत विकल्प निवडला असेल त्या प्रकरणी सदर अधिकारी / कर्मचारी यांची NPS निवृत्तीवेतन प्रणालीचे सभासदत्व संपुष्टात आणून करावयाची कार्यपद्धती सदर शासन निर्णयांमध्ये निश्चित करण्यात आलेले आहेत .
यांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , राज्य शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1982 नियम 1984 व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी लागु करण्याबाबत विकल्प संबंधित राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांनी विभाग प्रमुख / कार्यालय प्रमुख यांच्याकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत , तसेच विभाग प्रमुख / कार्यालय प्रमुख यांनी संबंधित विकल्प अर्जाची तपासणी करुन प्रस्तुत कर्मचारी यांची नियुक्ती दिनांक 01.11.2005 पुर्वीच्या जाहीरातीवर आधारित आहे हे निश्चित करुन असे प्रस्ताव नियुक्ती प्राधिकारी यांच्याकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
सदर निर्णयानुसार स्पष्ट करण्यात आलेले आहेत कि , शासकीय कर्मचाऱ्याच्या NPS योजनांच्या खात्यात जमा असणारी रकमेपुरता प्रान खाते जोडून देणेबाबत सुचना देण्यात आल्या आहेत , प्रस्तुत सुचना संबंधित कर्मचाऱ्याला दिनांक 02.02.2024 च्या शासन निर्णयानुसार अनुज्ञेय ठरणाऱ्या लाभासाठी विचारात घेवू नयेत असे निर्देश देण्यात आलेले आहेत .
तसेच दिनांक 01 नोव्हेंबर 2005 रोजी व त्यानंतर राज्य शासनांमध्ये रुजू झालेल्या अधिकारी / कर्मचारी यांना वित्त विभागाच्या दिनांक 02.02.2024 नुसार सदर योजना लागू करण्यात आले आहेत , अशा प्रकरणी NPS योजना प्रणालीच्या खात्यावतील संचित निधी परतावा मंजूर करण्यात यावा असे निर्देश देण्यात आलेले आहेत . या संदर्भातील वित्त विभागांकडून दिनांक 02 मे 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.