राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत , अजित पवार यांची विधानसभेत महत्वाची माहिती सादर !

Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee old pension scheme ajit pawar ] : राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत , राज्याचे वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत उपस्थित प्रश्नाला उत्तर देताना अत्यंत महत्वपुर्ण माहिती दिली आहे .

राज्यातील अनुदानित शाळांमधील 01 नोव्हेंबर पुर्वी जाहीरात निघालेल्या , शासन सेवेत रुजु झालेल्या शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचऱ्यांना इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे जुन्या निवृत्तीवेतनाचा एक वेळ पर्याय उपलब्ध करुन दिला जाईल का ? केल्यास कालावधी नमुद करण्याची विनंती केली असता .. यावर उत्तर देताना राज्याचे वित्त मंत्री यांनी सांगितले कि , या संदर्भातील प्रस्ताव वित्त मंत्रायात आलेला असून , सदर कर्मचाऱ्यांना 03 महिन्यांच्या आत जुन्या पेन्शनचा लाभ लागु करण्यात येईल असे अजित पवार यांनी म्हटले आहेत .

तसेच पुढे अजित पवार यांनी बोलताना सांगितले कि , जिल्हा परिषद कर्मचारी हे देखिल सरकारचा भाग असून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत देखिल सकारात्क निर्णय घेण्यात येईल , याकरीता किती अतिरिक्त भार येईल याची माहिती सरकारकडून घेतली जात असल्याची माहिती देण्यात आली आहे .

राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत विधानसभेत काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात , वांद्रयाचे भाजपा आमदार आशिष शेलार तसेच ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता , सदर प्रश्नाला वित्त मंत्री अजित पवार यांच्याकडून उत्तर देण्यात आले . जुनी पेन्शनवर विधानसभेत बऱ्याच वेळ चर्चा झाली , यांमध्ये सरकारकडून सकारात्मक आश्वासन देण्यात आले आहेत .

राज्यातील NPS धारकांना जुनी पेन्शन बाबत अपडेट : राज्यातील एनपीएस धारक कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जुनी पेन्शन योजना लागु करण्याची मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली असता , यावर अजित पवार उत्तर देताना सांगितले कि , ज्यावेळी राज्यातील सन 2005 नंतर रुजु होणाऱ्या कर्मचाऱ्यांना एनपीएस योजना लागु करण्यात आली , त्यावेळी विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री होती , त्यामुळे सदर योजनांमध्ये बदल करुन राज्यतील अधिकारी / कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून येण्याचे काम महायुती सरकारकडून करण्यात येत आहेत ..

तसेच याबाबत तीन जनांची समिती स्थापना करण्यात आली होती , सदर समितीने दिलेल्या अहवालानुसार राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागु करण्यात येईल , अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment