Live Marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Demand ] : राज्यातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्याबाबत , महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची दिनांक 06 नोव्हेंबर 2023 रोजी राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली आहे . यांमध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असणारा विषय म्हणजे जुनी पेन्शनचा अहवाल 20 नाव्हेंबर 2023 पर्यंत राज्य सरकारला प्राप्त होणार आहे .
सदर बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली , यांमध्ये प्रामुख्याने जुनी पेन्शनबाबत राज्याचे मुख्य सचिव बोलताना सांगितले कि , जुनी पेन्शन संदर्भात नेमण्यात आलेली समितीला अहवाल दिनांक 20 नोव्हेंबर 2023 पर्यंत राज्य शासनांस सादर करण्यात येणार आहे , त्यानंतर राज्य शासनांकडून उचित निर्णय घेण्यात येईल .
तसेच केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रग्रती योजनेमधील 5400 ग्रेड पे ची मर्यादा रद्द करणेबाबत , महासंघाकडून वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येत असतो , यावर राज्याचे मुख्य सचिव यांनी वित्त विभागास स्पष्टपणे निर्देश दिले आहे कि 5400 ग्रेड पे ची मर्यादा करण्यात यावेत .
तसेच जुनी पेन्शन योजना नंतर दुसऱ्या कर्मचाऱ्यांची मोठी मागणी म्हणजे केंद्र सरकार तसेच देशातील इतर 25 राज्य सरकारने सेवानिवृत्ती वयांमध्ये 60 वर्षांपर्यंत वाढविण्यात आली आहे , याच धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचे वय ( Retirement Age 60 Years ) करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली असता , यावर राज्याची सकारात्मक भुमिका असल्याचे निदर्शनास आणुन दिले .
याशिवाय 80 वर्षे वयावरील पेन्शनधारकांना केंद्र सरकारप्रमाणे वाढीव पेन्शन , वेतनत्रुटी दुर करणे , अशा विविध प्रलंबित मागण्यांवर राज्याचे मुख्य सचिव मा.श्री मनोज सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली सकारात्मक चर्चा करण्यात आली .
महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाकडून सदर बैठकीचे इतिवृत्त प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातुन जाहीर केले आहेत , ते पुढीलप्रमाणे पाहु शकता .


आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.