राज्य कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर : या प्रमुख दोन मागणीवर राज्य सरकार सकारात्मक , लवकरच निर्णयाची घोषणा !

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Demand New Update News ] : राज्यातील तब्बल लाख कर्मचारी हे जुनी पेन्शन या प्रमुख मागणीसाठी एकवटले आहेत , जुनी पेन्शनच्या मागणीकरीता अधिवेशनावर धडक मोर्चा काढण्यात  आला होता . त्याचबरोबर जुनी पेन्शन नंतरची सर्वात मोठी मागणी म्हणजे सेवानिवृत्तीचे वय ( Retirement Age ) वाढविणे होय .

जुनी पेन्शन ( Old Pension ) : जुनी पेन्शनची मागणी आता सरकारची डोकेदुखी ठरली आहे , जुनी पेन्शन योजनावर तोडगा काढणे राज्य सरकारला आवश्यक आहे , अन्यथा आगामी विधानसभेत राज्य कर्मचारी पेन्शनला साथ देणाऱ्या पक्षाला मत देतील हे निश्चित आहे , याकरीता कर्मचाऱ्यांकडून वोट फॉर पेन्शन अभियान चालविली जात आहे .

यामुळे राज्य सरकारकडून जुनी पेन्शन बाबत सकारात्मक तोडगा काढण्यात येणार आहेत , राज्य सरकारच्या आगामी अर्थसंकल्पामध्ये जुनी पेन्शन सारखी पेन्शन प्रणाली लागु करणेबाबत विशेष तरतुद करण्यात येईल असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिवाळी अधिवेशन दरम्यान कर्मचाऱ्यांना दिलेले आहेत . यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना पेन्शन साठी आणखी तीन महिन्यांची वाट पाहावी लागणार आहे .

सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे ( Retirement Age 60 Year ) : जुनी पेन्शन नंतर कर्मचाऱ्यांची सर्वात मोठी मागणी म्हणजे राज्यातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे 60 वर्षे करणे हे होय . या मागणीवर राज्य अधिकारी महासंघाची राज्याचे मुख्य सचिव यांच्य समवेत झालेल्या बैठकीत , मुख्य सचिव यांनी नमुद केले कि , राज्यातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणेबाबत , राज्य शासन सकारात्मक असून सामान्य प्रशासन विभागांकडून सविस्तर प्रस्ताव तयार करण्याची बाब विचाराधीन आहे . अशी माहिती बैठकीदरम्यान मुख्य सचिवांनी दिलेली आहे .

यामुळे राज्यतील कर्मचाऱ्यांचे जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे या प्रमुख दोन मागण्यांवर राज्य सरकारकडून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment