Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee old pension , NPS & New NPS Scheme ] : राज्यातील एनपीएस धारक कर्मचाऱ्यांना नविन सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागु करण्याची घोषणा राज्य सरकारने मागील अर्थसंकल्पीय अधिवेशानानंतर केली आहे . या संदर्भात राज्य सरकारकडून अधिकृत्त अधिसूचना / निर्णय निर्गमित झालेला नाही , परंतु सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनांमधील देण्यात येणारे लाभांची घोषणा करण्यात आलेली आहे . जुनी पेन्शन , एनपीएस व सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये कर्मचाऱ्यांना कश्या प्रकारे लाभ प्राप्त होणार आहेत , याबाबतचा तुलनात्मक बाबी पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पेन्शन ( निवृत्तीवेतन ) : जुनी पेन्शन योजनांमध्ये कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर कोणत्याही अटीशिवाय शेवटच्या वेतनाच्या 50 टक्के रक्कम निवृत्तीवेतन म्हणून निश्चित केली जाते , तर राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये एनपीएस खात्यांमध्ये जमा झालेल्या रकमेवर अत्यल्प पेन्शन लाभ प्राप्त होईल , तर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये सेवा कालावधीनुसार पेन्शन लागु होणार आहे , यांमध्ये ज्या कर्मचाऱ्यांची सेवा ही 30 वर्षे व त्यापेक्षा अधिक असेल त्यांना शेवटच्या वेतनाच्या 50 टक्के रक्कम निवृत्तीवेतन म्हणून निश्चित केली जाईल , तर सेवा कालावधीनुसार 50 टक्के ( 30 वर्षे व त्या पेक्षा अधिक सेवा ) , 40 टक्के पेन्शन ( 20 ते 30 वर्षे सेवा ) , 35 टक्के पेन्शन ( 20 वर्षापेक्षा कमी सेवा ) अशा पद्धतीने निवृत्तीवेतन निश्चित केली जाईल .
डी.ए ( महागाई भत्ता ) लाभ : जुनी पेन्शन योजनांमध्ये व सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये महागाई भत्ता देण्याचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे , तर NPS मध्ये डी.ए देण्याचा अंतर्भाव नव्हता .
जुनी पेन्शन योजनांप्रमाणे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये लागु करण्यात आलेले लाभ : जुनी पेन्शन योजनांप्रमाणे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये मृत्यु उपदान , रुगणता उपदान , कुटुंब निवृत्ती वेतन , रुग्णता निवृत्ती वेतन , रजा रोखीकरण लाभ लागु करण्यात आलेले आहेत . तर जुनी पेन्शन प्रमाणे GPF योजना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये लागु करण्यात आलेली नाही .
पेन्शन वृद्धी : जुनी पेन्शन नुसार वेतन आयोगानुसार सुधारित पेन्शन वाढची तरतुद आहे , परंतु सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये याची तरतुद करण्यात आलेली नाही .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.