Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , प्रणित पवार : राज्य सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजनांच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत त्याचबरोबर काही प्रलंबित बाबी व आगामी मागण्यांबाबत देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहेत . हे आंदोलन देशव्यापी करण्यात येणार असल्याने देशातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन व आठवा वेतन आयोगाचे गठण करणे ही मागणी सारखी असणार आहे .

कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावुन घेणे , तसेच कामगार कायद्यातील कर्मचाऱ्यांच्या विरोधी असणाऱ्या नियमांमध्ये बदल करणे , पीएफआरडीए कायदा रद्द करणे , नविन शिक्षण धोरण रद्द करणे , आठवा वेतन आयोगाचे गठण करणे , जुनी पेन्शन योजना लागु करणे इत्यादी मागणींकरीता आखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या वतिने आदोलनाचे आयोजन करण्यात आलेले आहेत .

दिनांक 4 जुलै 2023 रोजी ठाणे जिल्हा कार्यालयासमोर मागणी दिन म्हणून दुपारच्य जेवणाच्या कालावधीमध्ये  निदर्शने करण्यात येणार असून या दिनास मागणी दिन म्हणून संबांधित करण्यात येणार आहेत .त्याचबरोबर समान काम समान वेतन हे तत्व समोर ठेवून कंत्राटी / रोजंदारी कर्मचाऱ्यांना नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे समान वेतन देण्यात यावेत .

हे पण वाचा : State Employee : राज्य कर्मचाऱ्यांना जुन महिन्यांच्या पगाराबाबत , आत्ताची मोठी अपडेट ! जाणून घ्या सविस्तर !

तसेच जुनी पेन्शन योजनांच्या निर्णयासाठी होत असलेला विलंब टाळुन राज्य कर्मचाऱ्यांना कोणत्याही अटीशिवाय 1982-83 ची जुनी पेन्शन योजना लागु करण्यात यावी . असे निर्देश देण्यात आलेले आहेत .तसेच चतुर्थश्रीणी कर्मचाऱ्यांचे पदे व्यपगत करु नयेत , सेवानिवृत्तीचे वय हे केंद्र सरकारप्रमाणे साठ वर्षे करावेत अशा मागण्यांसाठी दिनांक 4 जुलै 2023 आंदोलन करण्यात येणार आहेत .

केंद्र सरकारकडून आठवा वेतन आयोगाचे गठण करण्यात येत आहेत त्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागु करण्यासाठी नविन वेतन आयोगाची स्थापना करण्याची मागणी करण्यात येणार आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *