Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्य शाासन सेवेतील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे आर्थिक व सामाजिक सुरक्षा प्रदान होईल , अशी पेन्शन योजना लागु करण्यासाठी आता राज्य सरकारकडून मोठे सकारात्मक बाबी समोर येत असल्याचे पाहायला मिळत आहेत . मिडीया रिपोर्टनुसार शिंदे फडणवीस सरकारची केंद्रीय वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करुन राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे पेन्शन लागु करणे अत्यावश्यक असल्याची बाब पटवून दिले आहे .

महाराष्ट्र राज्य हे भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असल्याने , महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाची सत्ता गेल्यास , BJP चा मोठा राजकिय पराभव होणार आहे . यामुळे शिंदे फडणवीस राज्य सरकारने काही बाबी केंद्रीय वरिष्ठ नेत्यांशी पटवून दिलेल्या आहेत . नुकतेच शिंदे- फडणवीस सरकारचे शालेय शिक्षण मंत्री ना.दिपक केसरकर यांनी दिल्लीचा दौरा केला असल्याने पेन्शन योजनेच्या चर्चेला अधिकच महत्व आले आहेत .

कर्नाटर व हरियाणा राज्यांमध्ये कर्मचाऱ्यांनी एकजुटता दाखवून काँग्रेसची सत्ता आणली आहे , कारण काँग्रेसची सत्ता आल्यास कर्मचाऱ्यांना 1982-83 ची जुनी पेन्शन योजना कोणत्याही अटीशिंवाय लागु करण्यात येत आहे . यामुळे कर्मचारी राष्ट्रीय काँग्रेसच्या बाजुने मतदान करत आहेत . यामुळे महाराष्ट्र राज्यातील सत्ताधिकारी जुनी पेन्शनच्या बाबीवर जोखिम न घेता कर्मचाऱ्यांच्या बाजुने सकारात्मक भुमिका मांडण्यात येत आहे .

राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी जाहीर केल्याप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे आर्थिक व सामाजिक सुरक्षा प्राप्त होणारी नविन सुधारित पेन्शन योजना लागु करण्यात येणार आहे . पुढील वर्षी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका असल्याने , राज्य सरकारकडून राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनप्रमाणे पेन्शन लागु करण्यासाठी अभ्यास समितीकडून प्रस्ताव तयार करण्यात येत आहे .

हे पण वाचा : माहे मार्च 2023 चे वेतन अदा करणेबाबत आत्ताची मोठी अपडेट !

राज्य शासनांकडून गठित समितीचा अहवाल पुढील महिन्यांच्या 21 तारखेपर्यंत विधानभवनात सादर करण्यात शक्यता आहे . याकडे राज्यातील सर्व एनपीएस धारक कर्मचाऱ्यांचे लक्ष वेधले आहेत .कर्नाटक विधानसभेचा निकालाची समीक्षा करताना , सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करणे अत्यावश्यक असल्याची बाब कर्नाटक राज्यातील BJP नेत्यांनी केंद्रीय वरीष्ठ नेयांशी बोलताना सांगितले आहे .

शासकीय कर्मचारी , नोकर पदभरती , तसेच ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *