लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : केंद्र सरकारकडून आर्थिक अडचणींचे मुख्य कारण दाखवत सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना कोणत्याही स्थितीमध्ये लागु करता येणार नाही , असे विधान केल्याने महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचारी तसेच जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने मोठ्या प्रमाणात नाराजगी व्यक्त केली आहे .
यामुळे आता जुनी पेन्शन मिळविण्यासाठी संघटनांकडून लढा अधिकच तिव्र करण्याचा इशारा राज्य सरकारला दिला आहे .केंद्र सरकारने सांगितल्या प्रमाणे NPS धारक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करता येणार नाही , या निर्णयामुळे राज्य सरकार देखिल केंद्र सरकारच्या निर्णयावर ठाम असल्याचे दिसून येत आहे .परंतु आता राज्य सरकारी कर्मचारी परत एकदा जुनी पेन्शनच्या मागणीकरीता पुन्हा एकदा राज्यव्यापी आंदोलन करणार आहेत .
नुकतेच दिल्ली उच्च न्यायालयाने अर्धसैनिक जवानांना जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत , निर्णय दिला होता . या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयांमध्ये केंद्र सरकारकडून अपिल करण्यात आले व सदर निर्णयाला स्थगिती देण्यात आली . म्हणजेच केंद्र सरकार न्यायालयाने निर्णय देवूनही जूनी पेन्शन देण्यास नकार देत आहे , यामुळे आगामी काळात संघर्ष अधिकच तीर्व होणार असल्याची माहिती जुनी पेन्शन संघटनेचे सोशल मिडीयाप्रमुख विनायक चौथे यांनी सांगितले आहे .
जुनी पेन्शन योजना लागु केल्यास , पेन्शनवर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होईल अशी चुकीची आकडवारी लोकांसमोर सरकारडून प्रसिद्ध केली जात आहे . यामुळे जनतेचे दिशाभुल केली जात आहे तर कर्मचाऱ्यांची निराशा कायम केली आहे .
हे पण वाचा : व्यवयाय संधी : नोकरी करता – करता करा हे व्यवसाय , होईल लाखो रुपयांची कमाई !
यामुळेच आता जो पक्ष जुनी पेन्शनच्या बाजुने असेल ( जुनी पेन्शन देईल ) त्याच पक्षाला मत देण्याचा निर्धार आता राज्य सरकारी कर्मचारी / संघटनांकडून करण्यात आला आहे . तर भविष्यात जुनी पेन्शनसाठी लढा हा अधिकच तीव्र करणार असल्याची माहिती जुनी पेन्शन संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांच्या कडून देण्यात आलेली आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !
- SSC / HSC महाराष्ट्र राज्य फेब्रु/ मार्च बोर्ड परीक्षा 2024 वेळापत्रक प्रसिद्ध ; पाहा / डाऊनलोड करा PDF
- राज्यात दि.27 ते 30 नोव्हेंबर पर्यंत राज्यातील या 09 जिल्ह्यात पावसाची शक्यता ; तर दि 01 ते 04 डिसेंबर काळात अवकाळी पावसाची शक्यता !
- एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार निवडुन येणाऱ्या संभाव्य आमदारांची नावे ; या 10 अपक्ष आमदारांचा देखिल समावेश .
- शिक्षकांची वाढीव पदे समायोजन करणेबाबत , महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित !
- इ.10 वी / 12 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक जाहीर ; जाणून घ्या तोंडी व लेखी परीक्षा वेळापत्रक !