State Employee : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे पेन्शन ! NPS पेन्शन योजनेत सुधारणा !

Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत सन 2005 नंतर रुजु झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर समोर येत आहे , ती म्हणजे जुनी पेन्शन प्रमाणे पेन्शन योजनेचा मोठा लाभ लवकरच लागु करण्यात येणार आहे . राज्य शासनांकडून गठित त्रिसदस्यीय समितीने जुन्या पेन्शनबाबतचा कर्मचाऱ्यांना दिलासादायक अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे .

राज्य शासनांकडून गठित त्रिसदस्यीय समितीने जुनी पेन्शन योजना व राष्ट्रीय पेन्शन योजनेचा तुलनात्मक अभ्यास करुन अहवाल राज्य सरकारकडे सादर केला असल्याची खात्रीदायक बातमी येत आहे .केंद्र सरकारकडून देखिल नविन पेन्शन योजना ( National Pension Scheme ) मध्ये सुधारणा करणेबाबत समितीची स्थापना करण्यात आलेली आहे , या समितीकडून तयार करण्यात आलेल्या अहवालाचा राज्य सरकारकडून देखिल अभ्यास करण्यात येणार आहे .

केंद्र सरकारकडून गठित अभ्यास समितीचा अहवाल जुन महिना अखेर केंद्र सरकारकडे सादर होण्याची शक्यता आहे . त्यानंतरच राज्य सरकारकडून पेन्शन योजनांबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे . परंतु राज्य सरकारने दिलेल्या लेखी आश्वासनांनुसार ,तीन महिन्याच्या अवधीनंतर राज्य कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन प्रमाणे पेन्शन लाभ अनुज्ञेय करण्यात येईल , या आश्वासनांनुसार तीन महिन्याचा कालावधी दि.14 जुन रोजी संपणार आहे .

हे पण वाचा : 25 वर्षे सेवा पुर्ण केल्यानंतर पुर्ण पेन्शनचा लाभ , तर 10% अतिरिक्त पेन्शन भत्ताचा लाभ ! सरकारने घेतला मोठा निर्णय !

यामुळे राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी , निमसरकारी ( जिल्हा परिषदा ) कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचारी  यांना जुन्या पेन्शन प्रमाणे पेन्शनचा लाभ जुन महिना अखेर लागु होवू शकते .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Comment