जुनी पेन्शन नाही परंतु कर्मचाऱ्यांना आता सेवानिवृत्तीनंतर मिळणार निश्चित रक्कम , लोकसभेच्या निवडणुकीपुर्वीच होणार मोठी घोषणा !

Spread the love

Live Marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी [ Old Pension Scheme ] : सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर जुनी पेन्शन लागु करण्याची राज्य सरकारची इच्छा तर दिसुन येत नाही , परंतु सेवानिवृत्तीनंतर निश्चित रक्कम देण्याची मोठी घोषणा राज्य सरकारकडून होण्याची शक्यता आहे . कारण पुढील वर्षी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका होणार असल्याने , कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी सरकारकडून जुनी पेन्शनला पर्याय शोधले जात आहेत .

जुनी पेन्शन नुसार सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीच्या वेळी मिळणाऱ्या मुळ वेतनाच्या 50 टक्के रक्कम पेन्शन म्हणून दिली जाते तर नव्या पेन्शन योजना नुसार अत्यल्प 5 ते 10 हजार इतकीच पेन्शन मिळत आहे . परंतु आता यांमध्ये बदल करण्याची राज्य सरकारकडून तयारी सुरु आहे . निवडणुकांच्या आचारसंहिता पुर्वीच सरकारी कर्मचाऱ्यांना निश्चित पेन्शन मिळेल अशा पद्धतीने पेन्शन योजना लागु करण्याची शक्यता आहे .

ज्यांमध्ये सेवानिवृत्तीच्या वेळी मिळणाऱ्या मुळ वेतनाच्या 30 ते 35 टक्के रक्कम पेन्शन म्हणून मिळेल , ज्यांमध्ये महागाई भत्ताचा समावेश देखिल असू शकणार आहे , अशी माहिती विश्वसनिय सुत्रांनुसार समजली आहे .ज्यामळे सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर निश्चित पेन्शन मिळण्याचा मार्ग मोकळा होईल .

राज्यातील तब्बल 18 लाख सरकारी कर्मचारी दिनांक 08 नोव्हेंबर पासुन सहकुटुंब तहसिल कार्यालयांवर आंदोलन महाराष्ट्र राज्य शासकीय – निमशासकीय शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारला इशारा दिल्याने , राज्य सरकारवरील दबाव अधिकच वाढत आहेत . यामुळे राज्य सरकारडून यांमध्ये मध्यम मार्ग काढण्यात येत आहेत .

जुनी पेन्शन लागु करणेबाबत , गठित समितीला तसा अहवाल सादर करण्याच्या सुचना राज्य सरकारने दिलेले आहेत .निवृत्तीच्या वेळी पगाराच्या 30 ते 35 टक्के रक्कम पेन्शन म्हणून दिल्यास , सदर कर्मचाऱ्यांस सेवानिवृत्तीनंतर आर्थिक व सामाजिक सुरक्षा प्राप्त होईल , परंतु सध्याच्या घडीला राज्य सरकारकडून वेतनातुन करण्यात येणारी कपात ही कायम असणार आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment