जुनी पेन्शन मागणीसाठी दिनांक 9 ऑगस्ट रोजी अधिकारी /कर्मचाऱ्यांची राज्यभर बाईक रॅलीचे आयोजन!

Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : सर्वांना जुनी पेन्शन योजना व अन्य प्रलंबित मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेकडून बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहेत , या बाईक रॅलीमध्ये राज्यातील अधिकारी महासंघ देखिल सहभाग घेणाार आहे .याबात महसंघाकडून प्रसिद्धीपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहेत .

सर्वांना जुनी पेन्शन योजना व अन्य प्रलंबित मागण्यांसदर्भातील संप आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या अध्यक्षतेखाली दिनांक 20 मार्च 2023 रोजी महासंघासमवेत झालेल्या बैठकीत जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे आर्थिक लाभ देण्याबाबत , शासन सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री यांनी नि: संदिग्धपणे स्पष्ट केले होते . नविन पेन्शनधारकांना सामाजिक आणि आर्थिक स्थेर्यासह निवृत्तीवेतन देण्याचे तत्व पाळण्याचे राज्य शासनाने दिलेले लिखित आश्वासन व मा. मुख्यमंत्री महोदयांनी केलेल्या आवाहनास अनुसरुन महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने दिनांक 28 मार्च 2023 पासूनचे नियोजित बेमूदत संप आंदोलन संस्थगित केले होते .

त्या अनुषंगाने त्रिस्तरीय समितीसमोर अधिकारी महासंघाने दोन्ही बैठकांमध्ये जुन्या पेन्शन योजनेइतकेच आर्थिक लाभ मिळावे , अशी आग्रही मागणी केली आहे तसेच त्रिस्तरीय समितीची वाढीव मुदतही संपत आली असून सदर समितीचा अहवाल शासनास अद्याप सादर झालेला नाही .मा.मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत सर्वच मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली असली तर प्रलंबित माण्यांवर शासन निर्णय व्हावेत, अशी महासंघाची आग्रही भूमिका असल्यामुळे , जुन्या पेन्शनसह इतर जिव्हाळ्याच्या मागण्यांबाबत , भविष्यात होणाऱ्या निर्णायक आंदोलनात अधिकारी महासंघ अग्रेसर राहणार असल्याबाबत महासंघाने शासनास यापूर्वीच सुचित केले होते .

हे पण वाचा : पावसाळी अधिवेशनांमध्ये पुन्हा एकदा पेन्शन वाढीबाबतचे बिल सादर !

जूनी पेन्शन योजना व अन्य प्रलंबित मागण्यांकडे शासनाकडून सातत्याने होत असलेले दुर्लक्ष व दिरंगाई यामुळे राज्यातील अधिकारी – कर्मचाऱ्यांमध्ये कमालीचा असंतोष आहे , या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने दिनांक 09 ऑगस्ट 2023 रोजी राज्यभर बाईक रॅलीचे आयोजन केले आहे . अधिकारी – कर्मचाऱ्यांच्या मागण्या समान असून , मागण्यासंदर्भात अधिकाऱ्यांच्या भावनाही तीव्र असल्यामुळे सदर बाईक रॅलीमध्ये राज्यभर तसेच जिल्हाधिकारी कार्यालये , मुंबई शहर व मुंबई उपनगर येथील निदर्शनांमध्ये सर्व राज्यपत्रित अधिकारीही सहभागी होणार आहेत .

हे पण वाचा : भारत बनला जगातील सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था , या युरोपियन राष्ट्रांना टाकले मागे !

या संदर्भात महासंघाकडून राज्याचे मुख्यमंत्री यांना सादर केलेले निवेदन पुढीलप्रमाणे आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Comment