Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Old Pension Scheme ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे आर्थिक व सामाजिक लाभ लागु करणेबाबत , राज्य शासनांकडून सेवानिवृत्त 3 सनदी अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्यात आली होती . या समितीला प्रथम तीन महिन्यांची मुदत होती , परंतु राज्य शासनांकडून आत्तापर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे .
पेन्शन अहवाल उद्या होणार सादर : सेवानिवृत्ती सनदी अधिकारी यांमध्ये सुबोधकुमार , सुधीर श्रीवास्तव आणि के. पी बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली मार्च 2023 मध्ये गठीत समिती पेन्शन बाबत तयार करण्यात आलेला अहवाल उद्या दिनांक 20 नोव्हेंबर 2023 रोजी राज्य शासनांस सादर करण्यात येणार असल्याची अधिकृत्त माहिती राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी राजपत्रित अधिकारी महासंघ , राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना व राज्य सरकारी गट -ड कर्मचारी मध्यवर्ती संघटनांसोबत दिनांक 06 नोव्हेंबर 2023 रोजी झालेल्या बैठकीत सांगितले आहे .
सदर बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांच्या विविध 31 प्रलंबित मागणीवर सविस्तर चर्चा करण्यात येवून प्रलंबित मागणीवर पुढील कार्यवाही करणेबाबत योग्य ते निर्देश देण्यात आले .जुनी पेन्शन योजना बाबतचा अधिकृत्त अहवाल उद्या सादर करण्यात येईल , परंतु या अहवाला अंती राज्य शासनांसमोर जुनी पेन्शन योजना जशाच्या तसे लागु करणे हा पर्याय असेल परंतु राज्य शासनांकडून जशास तसे जुनी पेन्शन योजना लागु करण्यात येणार नाहीत .
यांमध्ये आंध्र प्रदेश राज्य सरकारने लागु केल्याप्रमाणे गॅरंटेड पेन्शन योजनास प्रथम प्राधान्य देण्यात येईल , तर त्यांनतर केंद्र सरकारने सुचित केल्याप्रमाणे सेवेच्या कालावधीनुसार पेन्शन योजना लागु केले जावू शकते . तर तिसरा पर्याय म्हणजे राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्येच बदल करुन बाजारभावानुसार किंमत निश्चित न करता स्थिर योजना जसे अटल पेन्शन योजना प्रमाणे पुर्नरचित करण्यात येईल .ज्यांमध्ये कर्मचाऱ्यांना आर्थिक व सामाजिक सुरक्षा प्रदान होईल .
याबाबत उद्या राज्य सरकारला पेन्शन अहवाल प्राप्त झाल्यानंतर राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून अधिकृत आकडेवारीची सखोल अभ्यास करुनच राज्य शासनांकडून अधिकृत्त निर्णय घेण्यात येईल .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.