Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee / officer transfer shasan paripatarak ] : राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या सन 2024-25 या वर्षातील सार्वत्रिक बदल्या बाबत राज्य शासनांच्या ग्रामविकास विभागांकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .

ग्रामविकास विभागाच्या दिनांक 08 ऑगस्ट 2024 रोजीच्या शासन परिपत्रकानुसार राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 च्या अनुषंगाने करावयाच्या बदल्या / पदस्थापनांबाबत भारत निवडणुक आयोग तसेच राज्याच्या मुख्य निवडणुक अधिकारी यांच्या संदर्भाधिन पत्रांनुसार महत्वपुर्ण सुचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत .

महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणुक अधिकारी यांच्या दिनांक 05 ऑगस्ट 2024 रोजीच्या पत्रानुसार दिलेल्या सुचनांनुसार राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना आपल्या जिल्ह्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र विकास सेवा , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी / प्रकल्प संचालक , उप मुख्य कार्यकारी अधिकारी , गट विकास अधिकारी , गट अ व सहायक गट विकास , गट ब संवर्गातील अधिकाऱ्यांना महाराष्ट्र विधानसभा निवडणुक 2024 च्या अनुषंगाने सोपविण्यात आलेल्या निवडणुक विषयक कामकाजाचा तपशिल तात्काळ उपलब्ध करुन देण्यात यावा असे नमुद करण्यात आले आहेत .

हे पण वाचा : भारतीय रेल्वे मध्ये विविध पदांच्या 1376 जागेसाठी आत्ताची नविन पदभरती , लगेच करा आवेदन !

तसेच सदर सदंर्भाधिन पत्रानुसार ग्रामविकास विभागाच्या अधिनस्त महाराष्ट्र विकास सेवा संवर्गातील अधिकाऱ्यांपेकी काही अधिकाऱ्यांच्या बाबतीत सार्वत्रिक लोकसभा निवडणुक – 2024 साठी सोपविण्यात आलेल्या निवडणुक विषयक कामकाजांमध्ये काही कालावधी नंतर / वारंवार बदल केल्याचे तसेच रद्द केल्याचे निदर्शनास आले आहेत . त्यामुळे विभागाने सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने मा. भारत निवडणुक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार केलेल्या बदल्यांबाबत , न्यायालयीन प्रकरणांना सामोरे जावे लागले आहेत .

सदरची बाब विचारात घेवून , सर्व जिल्ह्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ( निवडश्रेणी ) , अतिरिक्त मुख्‍य कार्यकारी अधिकारी / प्रकल्प संचालक , उप मुख्य कार्यकारी अधिकारी , गट विकास अधिकारी , गट अ व सहायक गट विकास अधिकारी , गट ब संवर्गातील अधिकाऱ्यांना सोपविण्यात येणारे निवडणुक विषयक कामकाज कालपरत्वे येणार नाही , याबाबत खातरजमा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *