Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Daily Allowance sudharana GR ] : राज्य शासन सेवेतील शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना शासकीय कामकाजास्तव हॉटेल वास्तव्यासाठी देय असलेल्या दैनिक भत्याच्या दरांत सुधारणा करणेबाबत राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 07 ऑक्टोंबर 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
6 व्या वेतन आयोगाच्या शिफारशींच्या अनुषंगाने राज्यातील सरकारी अधिकारी / कर्मचाऱ्यांना देय असलेल्या प्रवास व दैनिक भत्यांच्या दरात वितत विभागाच्या दिनांक 03.03.2010 नुसार सुधारणा करण्यात आली आहे . सदर निर्णयांमध्ये अनुसुचित दर आकारणाऱ्या हॉटेलमधील वास्तव्याकरीता विहीत केलेल्या दैनिक भत्याच्या दरात दिनांक 02 मे 2013 रोजीच्या शासन निर्णयायनुसार सुधारणा करण्यात आलेले आहेत .
तसेच शासकीय दौऱ्यावरील राज्य शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना दिल्ली , कोलकाता ,बंगळूर चैन्नई व मुंबई येथे वास्तव्याकरीता ( अनुसूचित दर आकारण्याऱ्या हॉटेल ) देय असलेल्या दैनिक भत्यातून दैनंदिन खर्च भागविणे शक्य होत नसल्याने , सातव्या वेतन आयोगानुसार केंद्र शासनाच्या पार्श्वभुमीवर दिनांक 13.07.2017 रोजीच्या कार्यालयीन आदेशानुसार सदर निर्णयांमध्ये सुधारणाा करण्याच्या बाब राज्य शासनांच्या विचाराधीन होती .
सदर शासन निर्णयानुसार , राज्यातील शासकीय व इतर पात्र अधिकारी / कर्मचाऱ्यांना शासकीय कामकाजास्तव मुंबई , हैद्राबाद , दिल्ली , बंगळुर , कोलकाता शहरातील हॉटेलमध्ये वास्तव्य केल्यास , देय असणारे दैनिक भत्याचे तसेच भोजन व संकीर्ण खर्चाचे सुधारित दर पुढीलप्रमाणे आहेत .
अधिकारी / कर्मचाऱ्यांचे वेतनस्तर | हॉटेल वास्तव्य करीता देय प्रतिपुर्ती | भोजन व संकीर्ण खर्च |
S– 30 व त्याहून अधिक | 7500/- प्रतिदिन | 1200/- |
S–25 ते S–29 | 4500/- प्रतिदिन | 1000/- |
S–20 ते S–24 | 2250/- प्रतिदिन | 800/- |
S–19 व त्यापेक्षा कमी | 1000/- प्रतिदिन | 500/- |
हॉटेल वास्तव्याची प्रतिपुर्तीची मागणीसाठी हॉटेलची पावती जोडणे आवश्यक असणार आहे , वरील नमुद दरांपेक्षा कमी शुल्क आकारणाऱ्या हॉटेलमध्ये वास्तव्य करण्याचा कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करणे आवश्यक असणार आहेत .तर प्रवास भत्याची प्रतिपुर्ती ही वित्त विभागाच्या दिनांक 03 मार्च 2010 रोजीच्या शासन निर्णयात नमुद केल्याप्रमाणे अनुज्ञेय असणार आहेत .
या संदर्भात राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 07 ऑक्टोंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.