Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ state employee October payment update ] : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात ऑक्टोबर पेड इन नोव्हेंबर वेतन देयका बाबत , मोठी अपडेट समोर येत आहे . ती म्हणजे ऑक्टोबर पेड इन नोव्हेंबर वेतन देयकासोबत कर्मचाऱ्यांना इतर वेतन व भत्ते मिळणार आहेत .
वाढीव महागाई भत्त्याचा ( DA ) लाभ : केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ केल्यास , निश्चितच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ लागू करण्यात येईल . सदर वाढीव महागाई भत्ता ऑक्टोबर पेड इन नोव्हेंबर वेतन देयकासोबत अदा केला जाऊ शकतो .
महागाई भत्ता फरकाची रक्कम : माहे जुलैपासून कर्मचाऱ्यांना सुधारित महागाई भत्ता लागू करण्यात येतो , यामुळे सुधारित महागाई भत्त्याचे दर लागू केल्यास , माहे जुलै ते सप्टेंबर या 03 महिन्याच्या महागाई भत्ता थकबाकीची रक्कम अदा करण्यात येईल .
दिवाळी सण ॲग्रीम : राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिवाळी सणाला सण ॲग्रीम दिले जातो , यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिवाळी सणाला 12,500/- रुपये इतका सण ॲग्रीम रक्कम बिनव्याजी दिले जाते . जी रक्कम पुढील 10 महिन्याच्या वेतनातून दरमहा 1250/- रूपये कपात केली जाते .
यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना पुढील महिन्यांमध्ये मोठा आर्थिक लाभ मिळेल . ज्यामध्ये वाढीव महागाई भत्ता (DA) , महागाई भत्ता थकबाकी तसेच दिवाळी सण ॲग्रीम रकमेच्या समावेश राहील .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.