Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee November month regular payment update ] : कर्मचाऱ्यांच्या माहे नोव्हेंबर महिन्याचे नियमित वेतन देयक सादर करणेबाबत , वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहेत .
सदर वेळापत्रकानुसार , माहे नोव्हेंबर 2024 चे वेतन देयक सादर करताना डीडीओ – 1 यांनी DDO -2 कडे देयक फॉरवर्ड करण्याकरीता दि.13.11.2024 पर्यंत कालावधी देण्यात आला आहे . तर हायस्कूल मुख्याध्यापक / गट शिक्षणाधिकारी यांनी हार्ड कॉपरी प्रतिस्वाक्षरीस्तव पंचायत समिती स.ले.अ.यांना दि.15.11.2024 पर्यंत सादर करण्याचे निर्देश आहेत .
तर DDO – 2 ने शालार्थ प्रणालीतुन देयक DDO – 3 कडे 19 नोव्हेंबर पर्यंत सादर करण्याचे निर्देश आहेत . तर हायस्कुल मुख्याध्यापक / गटशिक्षणाधिकारी यांनी हार्ड कॉपी लेखा शाखा शिक्षण विभाग ( प्राथमिक ) येथे सादर करण्यासाठी दि.22.11.2024 पर्यंत मुदत आहे .
सदर वेतन देयके सादर करताना ज्या कर्मचाऱ्यांचे प्रान क्रमांक प्राप्त झालेले आहेत , अशांचे माहे नोव्हेंबर महिन्याच्या वेतन देयकातुन एनपीएस रक्कम कपात करण्याचे तर जे कर्मचारी या महिन्यांमध्ये सेवानिवृत्त होणार असतील अशांची एनपीएस वर्गणी व शासन हिस्सा कपात करण्यात येवू नयेत असे निर्देश आहेत .
तसेच पवित्र पोर्टल द्वारे नियुक्त शिक्षण सेवकांना शालार्थ आयडी मिळाले आहेत , अशांचे मानधन हे शालार्थ प्रणाली अंतर्गत अदा करण्याचे निर्देश आहेत . तर नव नियुक्त शिक्षण सेवकांना मानधन अदा करताना , त्यांचे बँक खाते क्रमांक व आयएफसी कोड शालार्थ प्रणालीमध्ये , CMP Bank Details या टॅब चा वापर करुन Verify करण्याचे निर्देश आहेत .
तर ब्रोकन कालावधीचे वेतन काढण्याकरीता संबंधित गटशिक्षणाधिकारी यांच्या परवानगीने काढण्याचे निर्देश आहेत .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.