Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee New Year Shasan Nirnay ] : राज्यातील खाली नमुद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत 02 लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागु करणेबाबत , राज्य शासनांच्या महिला व बाल विकास विभागांकडून दिनांक 01 जानेवारी 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

महिला व बाल विकास विभागाच्या दिनांक 19.09.2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार , खाली नमुद संघटनेवरील वर्ग तीन व चार मधील पदांना पदोन्नतीची संधी नसल्याने , येथील कर्मचारी अनेक वर्षापासून एकाच पदावर कार्यरत आहेत यास्तव त्यांच्या सेवेमध्ये कुंठितता आलेली असल्याने या कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना व सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागु करण्यास सन 2023 च्या हिवाळी अधिवेशा दरम्यान दि.07.12.2023 रोजीच्या नागपुर येथे झालेल्या मा.मंत्रीमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आलेली आहे .

यानुसार आता सदर शासन निर्णयानुसार राज्य शासन वित्त विभागाच्या दिनांक 20.07.2001 व दिनांक 01.04.2010 रोजीच्या शासन निर्णयानुसार , लागू करण्यात आलेली 12 व 24 वर्षानंतरची एक व दोन लाभाची आश्वासित प्रगती योजना महाराष्ट्र राज्य परिविक्षा व अनुरक्षण संघटनेच्या कर्मचाऱ्यांना अनुक्रमे एक लाभाची सुधारित सेवांतर्गत योजना दिनांक 01 ऑगस्ट 2001 व त्यानंतर पहिल्या लाभापासून 12 वर्षांनी दुसरा लाभ लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे .

सदरच्या निर्णयानुसार , महाराष्ट्र राज्य परिविक्षा व अनुरक्षण संघटना , पुणे या संस्थेच्या आस्थापनेवारील कर्मचाऱ्यांना सदर आश्वासित प्रगती योजनेचा लाभ लागु करताना सदर कर्मचाऱ्यांची सेवा संघटनेच्या प्रचलित सेवाप्रवेश नियमांनुसार झाली असल्याची तसेच यासाठी ते पात्र असल्याची खातरजमा करण्याची जबावदारी सचिव , महाराष्ट्र राज्य परिविक्षा व अनुरक्षण संघटना , पुणे यांची असणार आहे .

सदर बाबींकरता येणार खर्च हा एक्स 01 , सामाजिक सुरक्षा व कल्याण  , 02 , समाजकल्याण , 102 बाल कल्याण , 02 03 संगोपन व संरक्षणाची गरज असलेल्या मुलांसाठी संस्था चालविणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना सहायक अनुदान 2235 3041 या लेखाशिर्षाखाली उपलब्ध करण्यात येणाऱ्या वेतन अनुदानातुन भागविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .  या संदर्भात महिला व बाल विकास विभागांकडून दिनांक 01 जानेवारी 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *