Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee New Shasan Nirnay About Personal accident Insurance Scheme ] : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या संदर्भात वित्त विभागांकडून दिनांक 24 जानेवारी 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांकरीता संपुर्ण कर्मचाऱ्यांच्या वर्गणीवर आधारित राज्य शासकीय कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजना ही दिनांक 04 फेब्रुवारी 2016 रोजीच्या शासन निर्णयानुसार दिनांक 01 एप्रिल 2016 पासून लागु करण्यात आलेले आहे . सदर योजनांमध्ये वेळोवेळी बदल करण्यात येत असतो . कर्मचाऱ्यांच्या गट / संवर्ग निहाय वर्गणी आकारण्यात येत असते .

सदरच्या सुधारित शासन निर्णयानुसार , दिनांक 01 एप्रिल 2023 पासून राज्य शासकीय कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजनेची वार्षिक वर्गणी व राशीभूत रक्कम ( Capital Sum Insured ) यांमध्ये वाढ करण्यात येत आहेत . सदर वाढीव वार्षिक रक्कम व राशीभूत रक्कम गट निहाय पुढीलप्रमाणे पाहता येईल .

संवर्गराशीभुत विमा रक्कमवार्षिक वर्गणीवस्तु व सेवाकरएकुण वार्षिक वर्गणी
गट – अ25 लाख रु.750/-रु.135/-रु.885/-रु.
गट – ब20 लाख रु.600/-रु.108/-रु.708/-रु.
गट – क15 लाख रु.450/-रु.81/- रु.531/-रु.
गट – ड15 लाख रु.450/-रु.81/- रु.531/- रु.

सदर योजना अंतर्ग सदस्य असणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांची माहे फेब्रुवारीच्या वेतन देयकातुन सदर वार्षिक वर्गणी कपात करण्यात येईल .सदर योजनांची अंमलबजावणी ही प्रत्यक कार्यालय प्रमुखांनी करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

जर वरील वर्गणी ही माहे फेब्रुवारी देय मार्च 2023 च्या वेतनातुन व तद्नंतर कपात केली नसल्यास , पुढील दोन महिन्यांच्या वेतन देयकातुन कपात करणे आवश्यक असणार आहेत . अथवा सदर योजनेचे नविन सदस्य झाले असल्यास पुढीलप्रमाणे योजनेच्या कालावधीनुसार वर्गणीची कपात करण्यात यावेत असे निर्देश देण्यात आलेली आहे .

सदर योजना अंतर्गत दरवर्षी माहे फेब्रुवारी देय मार्च वेतन देयकातुन कपात करणत आवश्यक असणार आहेत . या संदर्भात सुधारित वित्त विभागाचा सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..

शासन निर्णय (GR)

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *