Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ New Pay Scale Shasan Nirnay ] : राज्य शासन सेवेतील काही पदांना सातव्या वेतन आयोगानुसार , वेतनत्रुट्या आढळून आलेल्या होत्या . सदर वेतनत्रुट्या आढळून आलेल्या पदांना राज्य वेतन सुधारणा समिती 2017 च्या अहवाल खंड -02 मधील वेतनश्रेण्यांविषयक व त्या अनुषंगिक शिफारशी स्विकृत करणेबाबत राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 13.02.2023 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
केंद्र सरकारच्या सातव्या वेतन आयोग शिफारशींच्या अनुषंगाने , केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेण्यांमध्ये दिनांक 01.01.2016 पासुनच सुधारित वेतन लागु करण्यात आलेले आहेत . केंद्र सरकारच्या निर्णयांच्या आधारे राज्यातील सरकारी तसेच इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणींमध्ये दिनांक 01 जानेवारी 2016 पासुन सुधारणा करण्यात आलेले आहेत .
यांमध्ये काही पदांच्या वेतनश्रेण्यांमध्ये वेतनत्रुट्या आढळून आलेल्या होत्या , अशा वेतनत्रुट्या आढळून आलेल्या पदांकरीता राज्य शासनांकडून राज्य वेतन सुधारणा समिती गठीत करण्यात आलेली होती . यानुसार खंड 02 मध्ये शिफारशी करण्यात आलेल्या , पदांना नविन सुधारित वेतनश्रेणी लागु करण्यात आलेल्या आहेत .
राज्य शासनांच्या राज्य वेतन सुधारणा समिती 2017 च्या अहवालाच्या अनुषंगाने खंड दोन मध्ये करण्यात आलेल्या शिफारशी संदर्भात निर्णय घेण्यात आलेले आहेत . सदर निर्णयांमध्ये विभागनिहाय पदांची सुधारित वेतन श्रेणी विशद करण्यात आलेली आहे .
या संदर्भात राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून निर्गमित करण्यात आलेला सविस्तर सुधारित वेतनश्रेणीबाबतचा शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
सुधारीत वेतनश्रेणी शासन निर्णय
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.