Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee new pension scheme important info ] : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना लागु करणेबाबत , राज्य शासनांकडून महत्वपुर्ण माहिती जाहीर करण्यात आलेली आहेत , सदर माहितीनुसार राज्यातील कर्मचाऱ्यांना शेवटच्या वेतनाच्या 50 टक्के रक्कम पेन्शन म्हणून दिली जाणार आहेत , तर गुंतवणुक जोखीम शासन स्विकारणार आहेत .
राज्य शासन सेवेत दिनांक 01 नोव्हेंबर 2005 रोजी व त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता राष्ट्रीय पेन्शन योजना ऐवजी सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागु करण्यात येणार आहेत . याकरीता गठीत समितीने आपला अहवाल राज्य शासनांस सादर केला असून , सदर समितीने सादर केलेल्या अहवालानुसार , राज्यातील एनपीएस धारक कर्मचाऱ्यांना आता निवृत्तीनंतर शेवटच्या मुळ वेतनाच्या 50 टक्के रक्कम पेन्शन स्वरुपात दिली जाणार आहे .
सुधारित पेन्शनबाबत काही आकडेवारी : राज्यांमध्ये 13,45,000 इतके राज्य व राज्य स्वायत्त संस्था मध्ये कर्मचारी कार्यरत आहेत . सध्यस्थितीमध्ये जुन्या पेन्शनवर 52,689 कोटी रुपये इतका निधी खर्च होतो , तर राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत शासनांचा हिस्सा 7,686 कोटी रुपये इतका आहे . तसेच दरवर्षी राज्यातील कर्मचाऱ्यांच्या वेतनावर 1,27,544 कोटी रुपये इतका निधी खर्च होतो .
हे पण वाचा : राज्यात गृह विभाग अंतर्गत गृहरक्षक पदाच्या 6500+ जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
राज्य शासनांकडून गठित करण्यात आलेली समितीने राष्ट्रीय पेन्शन योजना व जुनी पेन्शन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करुन सदर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेचा महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आला आहे .
सुधारित पेन्शन योजनाचा निर्णय कधी ; सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागु करणेबाबत अधिकृत्त शासन निर्णय / अधिसुचना पुढील 02 महिन्यांमध्ये निर्गमित होण्याची शक्यता आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.