Live marathipepar , प्रणिता पवार [Shasan Nirnay ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात राज्य वेतन सुधारणा समिती 2017 च्या अहवाल खंड दोन मधील वेतनश्रेणी विषयक व अनुषंगिक शिफारसी राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना लागू करणे संदर्भात राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून दिनांक 7 नोव्हेंबर 2023 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक 13 फेब्रुवारी 2023 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयान्वये शासनाने राज्य वेतन सुधारणा समिती 2017 च्या अहवालाच्या खंड दोन मधील शिफारसी संदर्भात निर्णय घेतले आहेत . राज्य वेतन सुधारणा समितीने केलेली शिफारस शासनाने मान्य करून ज्या संवर्गांना सुधारित वेतन स्तर मंजूर केलेली आहेत , अशा संवर्गाची माहिती सदर शासन निर्णयामध्ये देण्यात आलेली आहे .
राज्यातील जिल्हा परिषदांमधील कर्मचारी हे स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्मचारी असून राज्य शासकीय कर्मचारी नाहीत . त्यामुळे राज्यातील जिल्हा परिषदांमधील कर्मचाऱ्यांना शासनाने कोणतेही नियम, अधिनियम ,शासन निर्णय, शासन परिपत्रक इत्यादी थेट लागू होत नाहीत , आणि लागू करायचे असल्यास ग्रामविकास विभाग स्वतंत्र आदेश काढून सदर बाबी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना लागू करीत असतो .
यामुळे राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक 13 फेब्रुवारी 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला शासन निर्णयातील सुधारित वेतन स्तर राज्यातील जिल्हा परिषदांमधील लघुलेखक ( उच्चश्रेणी ) , लघुलेखक ( निम्न श्रेणी ) , विस्तार अधिकारी लागू करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाच्या विचाराधीन होता . यानुसार आता सदर शासन निर्णय वित्त विभाग महाराष्ट्र शासन निर्णय दिनांक 13 फेब्रुवारी 2023 मधील सुधारित वेतन स्तर राज्यातील जिल्हा परिषदांमधील लघुलेखक ( उच्चश्रेणी ) , लघुलेखक ( निम्न श्रेणी ) , विस्तार अधिकारी या संवर्गाच्या कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येत आहेत .
राज्य वेतन सुधारणा समितीने केलेली शिफारस शासनाने मान्य केल्यामुळे राज्यातील जिल्हा परिषदांमधील ज्या संवर्गांना सुधारित वेदस्तर मंजूर करण्यात येत आहेत , अशा संवर्गाची माहिती खालील विवरणपत्रानुसार पाहू शकता ..
या संदर्भात ग्राम विकास विभागाकडून दिनांक 07 नोव्हेंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढील प्रमाणे पाहू शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.