Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee new pay scale & allowance increase shasan nirnay ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनस्तर आणि वाढीव भत्ता लागु करणे संदर्भात सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 03 जुलै 2024 रोजी महत्वपुर्ण 02 शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत .

यांमध्ये पहिल्या शासन निर्णयानुसार , राज्य वेतन सुधारणा समिती 2017 च्या अहवाल खंड – 2 मधील सुधारित वेतनश्रेणी राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग , मुंबई यांच्या आस्थापनेवारील लघूलेखक या संवर्गातील पदांना मंजूर करण्यात आलेले आहेत . सदर निर्णयानुसारसदर राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगातील लघुलेखक उच्चश्रेणी ( इंग्रजी ) , लघूलेखक निम्नश्रेणी ( इंग्रजी ) व लघूलेखक ( निम्नश्रेणी ) या संवर्गांच्या कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनस्तर लागु करण्यात आलेले आहेत .

यांमध्ये लघुलेखक ( उच्चश्रेणी ) पदाकरीता समितीने शिफारस केलेला सातव्या वेतन आयोगातील सुधारित वेतनस्तर हे एस – 16 नुसार 44900-132300/- अशी सुधारणा करण्यात येत आहेत . तर लघुलेखक ( निम्नश्रेणी ) या पदाकरीता एस -15 मध्ये 41800-132300/- अशी सुधारणा करण्यात येत आहे .

तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या 03 जुलै 2024 रोजीच निर्गमित करण्यात आलेल्या दुसऱ्या शासन निर्णयानुसार शासकीय परिवहन सेवेच्या वाहकचालकांना आता रुपये 1000/- प्रति एवढा धुलाई भत्ता मंजूर करण्यात येत आहे . तर शासकीय परिवहन सेवेतील वाहनचालकांना आता रुपये 250/- ऐवजी रुपये 1000/- प्रति माह एवढा धुलाई भत्ता मंजूर करण्यात येत आहेत , याकरीता सर्व वाहनचालकांनी नियमितरित्या स्वच्छ धुतलेले गणवेश परिधान करणे बंधनकारक असणार आहेत .

तसेच सर्व वाहन चालक यांनी नियमितपणे गणवेश परिधान करीत असल्याबाबत , अंमित खातरजमा करण्याची जबाबदारी ही नियंत्रक यांची असणार आहे , याबाबत सर्व वाहन चालक नियमितपणे गणवेश परिधान करीत असल्याबाबत प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असणार आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *