Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , बालाजी पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर समोर येत आहे , ती म्हणजे राज्य सरकारी व पेन्शनधार कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे वाढीव 4 टक्के डी.ए तसेच सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्यात येणार आहे . त्याचबरोबर राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनप्रमाणे लाभ देणेबाबत , राष्ट्रीय पेन्शन योजनेंमध्ये बदल अथवा नविन पेन्शन प्रणाली अंमलात आणली जाणार आहे .

केंद्र सरकारप्रमाणे 42 टक्के दराने महागाई भत्ता : महाराष्ट्र राज्य शासन सेवेमध्ये कार्यरत शासकीय –निमशासकीय ( जिल्हा परिषदा ) कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक ( GPF धारक ) यांना केंद्र सरकारने लागु केल्याप्रमाणे दि.01 जानेवारी 2023 पासून वाढीव 4 टक्के लागु करणेबाबतची नस्ती वित्त विभागांने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर करण्यात आलेली आहे , अशी माहिती राज्याचे मुख्य सचिव यांनी दिली आहे .

सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे : देशांमध्ये केंद्र सरकारने त्याचबरोबर इतर 25 राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षांवरुन 60 वर्षे केले आहेत .याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वय 60 वर्षे करण्याची मोठी मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे , राज्याचे मुख्य सचिव यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणेबाबत राज्याच्या मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक आयोजित करण्याची ग्वाही मुख्य सचिवांनी दिली आहे .

हे पण वाचा : मोठी खुशखबर : राज्य कर्मचाऱ्यांना 42 टक्के प्रमाणे महागाई भत्ता व सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे बाबतचा मोठा लाभ !

जुनी पेन्शन योजना : केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये बदल करण्याची प्रक्रिया सुरु आहे , याबाबत केंद्र सरकारकडून प्रस्ताव तयार करण्यात येत आहे . केंद्र सरकारने केलेल्या बदलाचा विचार करुनच राज्य सरकारकडून पेन्शन योजनेंमध्ये बदल करण्यात येणार आहे , यामुळेच राज्य सरकारने पेन्शन अहवालास एक महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली असून सदरचा अहवाल दि 31.07.2023 रोजी महाराष्ट्र राज्य सरकारला सादर करण्यात येणार आहे .

आपण जर शासकीय –निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *