लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार , शासन निर्णय : क्षेत्रीय स्तरावर तलाठी हे अत्यंत महत्वपुर्ण पद आहे .तलाठी हे पद ग्रामीण भागातील लोकांच्या विकासाठी शेतीविषयक कामे तसेच पीक पाहण्याीची ई-पिक पाहणी , नुकसान झाले असल्यास त्याची पंचनाम करणे , दुष्काळ , नैसर्गिक आपत्ती , अतिवृष्टी अदी प्रसंगी तात्काळा मदत व पुर्नवसनाचे काम करण्यासाठी तलाठी अत्यंत महत्वाचे पद आहे .
परंतु तलाठी कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याचे अनेक तक्रारी जनतेकडून व लोकप्रतिनिधीकडून राज्य शासनांस वारंवार कळविण्यात आले आहेत . तलाठी कर्मचारी हे मुख्यालयीच राहणे गरजेचे आहे परंतु एका तलाठीकडे अनेक गांवाचा मिळून सज्जा होतो त्याचा पदभार असतो , शिवाय सध्या राज्य शासनाच्या महसुल विभागांमध्ये तलाठी पदांच्या एकुण 15,744 पदे मंजुर असून त्यापैकी 5038 जागा रिक्त आहेत . रिक्त जागांपैकी राज्य शासनांकडून 4644 जागेवर पदभरती प्रक्रिया सुरु आहे .
यामुळे सध्या अनेक तलाठ्यांकडे कार्यरत सज्जापेक्षा दोन ते तिन सज्जांचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आलेला असल्याने , तलाठ्यांना मुख्यालयी राहणे शक्य होत नाही , परिणामी जनतेच्या अनेक गैरसोयी होत असताना दिसून येत असल्याने राज्य शासनांकडून आता पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
तलाठी पदांच्या पदभरती प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत तलाठ्यांचा दोरा / कार्यक्रम / बैठका या बाबत संबंधित ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डावर किंवा दर्शनी भागांमध्ये आगाऊ वेळांमध्ये प्रसिद्ध करण्यात यावेत .
तसेच तलाठी भेटीचे वेळापत्रक सुचना फलकावर लावण्यात यावेत , जेणेकरुन नागरिकांच्या गैरसोयी होणार नाही ,यावेळी सुचना फलकांवर मोठ्या अक्षरात तलाठी / मंडळ अधिकारी / तसेच नायब तहसिलदार यांचे नाव तसेच मोबाईल नंबर लावण्यात यावेत असे निर्देश देण्यात आलेले आहेत .
जनेतेच्या कोणत्याही प्रकारची गैरसोयी होणार नाही यासाठी तलाठ्यांनी उपाययोजना कराव्यात असे निर्देश सदर शासन निर्णयान्वये देण्यात आलेले आहेत . या संदर्भात महसुल विभागांकडून दिनांक 18.08.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !