राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांचे प्रतिमाह वेतन व भत्ते अदा करण्यासाठी अनुदान वितरण करणेबाबत शासन निर्णय निर्गमित ! GR दि.07.06.2024

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Monthly Payment & Allowance shasan nirnay ] : राज्यातील अधिकारी / कर्मचारी यांचे वेतन व भत्ते भागविण्यासाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरीता अनुदान वितरीत करण्याबाबत , ग्राम विकास विभागांकडून दिनांक 07 जुन 2024 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

राज्यातील मा.मंत्रीमंडाळाच्या दिनांक 31 मार्च 2022 रोजीच्या बैठकीमध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा- प्रशासन योजना बंद करण्याऐवजी राज्य शासनांकडून 100 टक्के राज्य योजना म्हणून पुढील 5 वर्षे म्हणजेच दिनांक 01 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2027 पर्यंत पुर्वीप्रमाणे सुरु ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे .

सदरच्या शासन निर्णयानुसार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा – प्रशासनमधील अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन व भत्ते अदा करण्याकरीता आवश्यक प्रतिमाह वेतनासाठी सरासरी खर्च व त्यांच्याकडील शिल्लक निधी विचारात घेवून सन 2024-25 करीता जिल्हा ग्रामीण यंत्रणामधील अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन व भत्ते अदा करण्याकरीता रुपये 7 कोटी रुपये फक्त इतका निधी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून अर्थसंकल्पिय वितरण प्रणालीवर ( बी.डी.एस .) जिल्हानिहाय खालील विवरणपत्रानुसार वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे .

सदरचा खर्च हा ग्राम विकास मागणी क्र.एल -03 , 2515 – इतर ग्रामीण विकास कार्यक्रम , 00-104- जिल्हा ग्रामीण विकास अभिकरण – प्रशासन – जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा – प्रशासकीय खर्च राज्य पुरस्कृत योजना , 36 सहायक अनुदाने ( वेतन ) या लेखाशिर्षांतर्गत सन 2024-25 च्या तरतुदीमधून भागविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

सदरचे अनुदान हे ज्या प्रयोजनाकरीता मंजुर करण्यात आलेले आहेत फक्त त्याच प्रयोजनाकरीता खर्च करण्यात यावेत , अन्यथा ती वित्तीय अनियमितता समजण्यात येईल , याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी असे नमुद करण्यात आलेले आहेत .

या संदर्भात राज्य शासनांच्या ग्राम विकास विभागांकडून दिनांक 07 जुन 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..

शासन निर्णय (GR)

Leave a Comment