Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee meeting with state sachiv ] : राज्यातील सरकारी / निमसरकारी तसेच निवृत्तीवेतनधारकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्याचे मा.मुख्य सचिव यांच्यासोबत उद्या दिनांक 24 जुन 2024 रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहेत .

या संदर्भात राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 20 जुन 2024 रोजी अधिकृत्त परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहेत . सदरची बैठकी ही शासनांच्या समक्रमांकाचे दिनांक 18 जुन 2024 रोजीच्या संदर्भाधिन पत्रांनुसार आयोजित करण्यात आलेली आहे . सदरची बैठक ही राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना , महाराष्ट्र यांच्या समवेत बैठक आयोजित करण्यात आलेली आहे .

या संदर्भात निर्गमित करण्यात आलेल्या परिपत्रकांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना , महाराष्ट्र यांच्या विविध मागण्यां संदर्भात मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना , महाराष्ट्र यांच्या समवेत‍ दिनांक 24 जुन 2024 रोजी वार सोमवार या दिवशी दुपारी 4.00 वाजता मा.मुख्य सचिव यांच्या मंत्रालयातील दालनात बैठक आयोजित करण्यात आली आहे .

सदर बैठकीच्या अनुषंगाने राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना , महाराष्ट्र यांच्या प्रलंबित मागण्याबाबत केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल , व त्याबाबत निर्गमित आदेश असल्यास त्यांच्या प्रतिसह संबंधित विभागाच्या अपर मुख्य सचिव यांना सदर बैठकीस उपस्थित रहाण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

या संदर्भात सामान्य प्रशासन विभागांमार्फत दिनांक 20 जुन 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *