Live Marathipepar , संगिता पवार [ State Employee New Good Update ] : राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी बातमी समोर येत आहे , ती म्हणजे राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या प्रलिंबित मागण्यांबाबत राज्य शासनांकडून बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहेत .
राज्यातील सर्व मुख्य सचिव तसेच राज्याचे प्रधान सचिव व महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे अध्यक्ष , तसेच राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांचे अध्यक्ष तसेच राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे अध्यक्ष यांना सदर बैठकीस उपस्थित राहण्यासाठी परिपत्रक जारी करण्यात आला असून , या संदर्भाती सविस्तर परिपत्रक पुढील प्रमाणे पाहु शकता .
सदर परिपत्रक हे सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 03 नोव्हेंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे .सदर परिपत्रकास राज्याचे मुख्य सचिव यांचे कार्यालयाचे दिनांक 02 नोव्हेंबर 2023 रोजीच्या परिपत्रकांचा संदर्भ घेण्यात आला आहे . यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करुन निकाली लावण्यात येणार आहेत .
या संदर्भात सा.प्र.विभागांकडून निर्गमित शासन परिपत्रकानुसार , मा.मुख्य सचिव कार्यालयाने अधिकारी / कर्मचारी यांच्या विविध मागण्यांबाबत मा.मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक वार सोमवार दिनांक 06 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 5.00 वाजता मा.मुख्य सचिव यांच्या मंत्रालयातील दालनात बैठक आयोजित करण्यात आली आहे .
तरी सदर बैठकीच्या अनुषंगाने प्रलंबित मागण्यांबाबत करण्यात आलेल्या कार्यवाहीचा संबंधित विभागाशी संबंधित अनुपालन अहवाल , त्याबाबत निर्गमित आदेश असल्यास त्यांच्या प्रती सह उपरोक्त नमुद अधिकारी / कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . तसेच बैठकीसाठी मागणीनिहाय अद्ययावत माहिती पाठविण्याबाबत संबंधितांना सुचना देण्याचे निर्देश सदर शासन परिपत्रकानुसार देण्यात आलेले आहेत .
या संदर्भात सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 03 नोव्हेंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.