Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Medical Checking Dhoran Paripatrak ] : राज्य शासन सेवेतील शासकीय अधिकारी / कर्मऱ्यांचे वैद्यकीय तपासणी धोरण निश्चित करणेबाबत सार्वजनिक आरोग्य विभागांकडून दिनांक 08 जानेवारी 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन शुद्धीपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
राज्य शासनांच्या सार्वजनिक आरोग्य विभागांकडून दिनांक 22 एप्रिल 2022 रोजीच्या तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 08.12.2022 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्य शासन सेवेत कार्यरत असणाऱ्या अधिकारी / कर्मचारी ज्यांचे वय हे 40 ते 50 वयोगट दरम्यान आहे त्यांना 02 वर्षातुन एकदा तर ज्यांचे वय हे 51 वर्षापेक्षा अधिक आहेत त्यांना दरवर्षी वैद्यकीय तपासणी करण्याकरीता रुपये 5000/- रुपये इतक्या रक्कमेपर्यंत खर्चाची प्रतिपुर्ती अदा करण्यास मान्यता देण्यात आली आहे .
याकरीता राज्य सरकारी अधिकारी / कर्मचाऱ्यांनी सरकारी तसेच निमसरकारी रुग्णालये ( Hospital ) तसेच वैद्यकीय महाविद्यालये ( Medical College ) येथे वैद्यकीय चाचण्या केल्यास त्या निशुल्क अथवा नाममात्र शुल्क असल्याने , त्यांची प्रतिपुर्ती आकारण्यात आलेल्या शुल्काच्या मर्यादेमध्ये अनुज्ञेय असणार आहे , तसेच सदर शुल्क प्रतिपुर्ती एकुण मर्यादा ही रुपये 5000/- इतक्या रकमेपर्यंत असणार आहे , सदर प्रतिपुर्तीची मागणी करताना वैद्यकीय चाचणी ( Test ) केल्याचे संबंधित संस्थांचे मुळ देयके आपल्य कार्यालयास सादर करणे बंधनकारक असणार आहेत .
40 वर्षे व त्यापेक्षा अधिक वयोमर्यादा असणाऱ्या सर्व वेतनश्रेणीतील व गटातील कार्यरत असणाऱ्या शासकीय सर्व अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांकरीता वैद्यकीय चाचण्यांचा तपशिल दिनांक 22.04.2022 रोजीच्या शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत . सदर दिनांक 22.04.2022 रोजीचे सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत .. शासन निर्णय दि.22.04.2022
सुधारित शासन शुद्धीपत्रक : राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे वैद्यकीय तपासणी धोरण बाबत दिनांक 08.01.2024 रोजी सार्वजनिक आरोग्य विभागांकडून सुधारित शासन शुद्धीपत्रकानुसार , वय वर्षे 40 ते 50 या वयोगटांतील गृह विभागातील अधिकारी / कर्मचारी यांना दोन वर्षातुन एकदा व वय वर्षे 51 व त्यावरील वयोगटातील सर्व अधिकारी / कर्मचाऱ्यांना दरवर्षी वैद्यकीय तपासणी ( Medical Checking ) अनुज्ञेय असल्याबाबत , तपासणी करीता रुपये 5000/- रक्कम प्रतिपुर्ती करण्याकरीता …
राज्य शासनांच्या सा.प्र.विभागाच्या दिनांक 08 डिसेंबर 2022 रोजीच्या प्रपत्र अ मध्ये नमुद करण्यात आलेल्या खाजगी रुग्णालयाद्वारे उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे . या संदर्भातील सविस्तर शासन शुद्धीपत्रक डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करावेत … सुधारीत शासन निर्णय दि.08.01.2024