Live Marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ Medical Bill ] : राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 01 डिसेंबर 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित झालेला आहे , सदर परिपत्रकांमध्ये वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके अदा करण्याकरीता कार्यवाही करणेबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत .
सन 2023-24 मध्ये वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके अदा करण्यासाठी परवानगी मिळणेबाबत दिनांक 20.11.2023 रोजीच्या शासन पत्रकांचा संदर्भ देण्यात आलेला आहे . यांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , दिनांक 26.10.2023 रोजी व्हीसीमध्ये वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके अदा करण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयाकडून लेखाशिर्षनिहाय मागणी करण्यात आली होती , तसेच विविध संघटना कडून मागणी करण्यात आली होती .
तसेच शासन पत्र क्र.वेतन 1223 / प्र.क्र 101 / टिएनटी – 03 दिनांक 20 नोव्हेंबर 2023 नुसार ऑनलाईन पद्धतीने देयके अदा करण्याची प्रणाली विकसित करण्यास साधारणपणे एक महिन्यांचा कालाधी लागणार असल्याने सदर प्रणाली मार्फतच थकीत देयके अदा करण्याची कार्यवाही करण्यात यावी अशा प्रकारचे शासन निर्देश दिलेले आहेत .
सन 2023-24 मध्ये वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके ऑनलाईन पद्धतीने अदा करणेसाठी शालार्थ प्रणालीमध्ये सुविधा विकसित करण्याची कार्यवाही सुरु असून शालार्थ प्रणालीमध्ये सदरची सुविधा उपलब्ध झाल्यानंतर 22020442 , 22020478 व 22020469 या लेखाशिर्षाखाली उपलब्ध तरतुदीमधून वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यास परवानगी देण्यात येत आहे .
तसेच सदरची वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके ही कार्यालयास प्राप्त झालेल्या आवक क्रमांकानुसार , अदा करण्याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .त्याचबरोबर प्रतिपुर्ती देयके अदा करणेबाबत वित्त विभाग , आरोग्य विभाग आणि शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णयानुसार व शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार , वैद्यकीय देयके अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच शासनाच्या ध्येयधोरणाच्या विसंगत कार्यवाही केल्यास , त्याची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित शिक्षणाधिकारी / शिक्षण निरीक्षक / अधिक्षक , वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक सर्व यांची असणार आहे .
या संदर्भात राज्य शासनांकडून दिनांक 01 डिसेंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन परिपत्रक खालीलप्रमाणे पाहु शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.