Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee medical bill paid shasan paripatrak ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या सन 2024-25 या आर्थिक वर्षात वैद्यकीय देयके ऑनलाईन अदा करण्याची परवानगी देणेबाबत शिक्षण संचालनालय ( माध्यमिक व उच्च माध्यमिक मार्फत दिनांक 02 जानेवारी 2025 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन परिपत्रकांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , सन 2024-25 या आर्थिक वर्षात दिनांक 30.09.2024 अखेर पर्यंतची वैद्यकीय देयके शालार्थ प्रणालीमधून ऑनलाईन काढण्यासाठी परवानगी देण्यात आली होती .
तथापि दिनांक 30 सप्टेंबर 2024 नंतर ऑनलाईन वैद्यकीय देयके वेतन पथक ( माध्यमिक ) कार्यालयास प्राप्त झाली असून , नियमित वेतन झाल्यानंतर अनुदान शिल्लक असल्याने शिल्लक अनुदानामधून वैद्यकीय देयके करण्यासाठी परवानगी मिळणेबाबत क्षेत्रिय कार्यालयांकडून मागणी करण्यात येत आहे .
त्यानुसार सन 2024-25 या आर्थिक वर्षात मंजूर अनुदान व जिल्ह्याच्या संभाव्य खर्च विचारात घेता लेखाशिर्ष 22020442 , 22020478 , 22020469 , 22020558 , 220576 , 22021901 , मध्ये वैद्यकीय देयके बीम्स प्रणालीवर उपलब्ध असलेल्या अनुदानातुन ऑनलाईन अदा करण्यास मान्यता देण्यात येत आहे . सदरची वैद्यकीय देयके आपल्या कार्यालयास प्राप्त आवक क्रमांकानुसार तसेच शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार व नियमाप्रमाणे अदा करावे असे निर्देश देण्यात आले आहेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.