Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee May Paid In Jun Payment Anudan ] : राज्यातील कर्मचाऱ्यांचे वेतन / निवृत्तीवेतन व आस्थापना अनुदाने वितरण करणेबाबत , राज्य शासनांच्या प्राथमिक शिक्षण संचालनालय मार्फत दिनांक 20 मे 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सन 2024-25 या आर्थिक वर्षातील माहे मे 2024 या महिन्याचा वेतन व भत्ते , निवृत्तीवेतन याबाबीचा खर्च भागविण्यासाठी शासनाने संचालनालय स्तरावर उपलब्ध करुन दिलेल्या तरतुदीच्या अधिन राहून प्राथमिक शिक्षण संचालनालय , महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून संबंधित जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषदा सर्व यांना खर्च करण्यास अनुमती देण्यात येत आहेत .
सदर परिपत्रकानुसार , प्राथमिक शिक्षण , प्राथमिक शिक्षणासाठी स्थानिक संस्थांना सहाय्य , प्राथमिक शिक्षणांसाठी स्थानिक संस्थांना सहाय्यक , महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 च्या कलम 182 नुसार जिल्हा परिषदांना सप्रयोजन अनुदाने , जिल्हा परिषदांनी चालविलेल्या प्राथमिक शाळा , 36 सहाय्यक अनुदाने ( वेतन ) तसेच केंद्रीय प्राथमिक शाळांची स्थापना , 36 सहाय्यक अनुदाने ( वेतन ) , तसेच सर्व साधारण शिक्षण , प्राथमिक शिक्षण , महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 च्या कलम 183 नुसार जिल्हा परिषदांना आस्थापना अनुदान क्र.36 सहाय्यक अनुदाने ( वेतन ) या लेखशिर्षांखाली अनुदान वितरण करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे .
सदरच्या परिपत्रकानुसार 2,221,8830/- ( अक्षरी – दोन हजार दोनशे एकवीस कोटी अठ्याऐंशी लाख वीस हजार फक्त ) निधी वितरीत करण्यास मंजूरी देण्यात येत आहे . सदर परिपत्रकानुसार सुचित करण्यात आलेले आहेत कि , ज्या उद्देशासाठी अनुदान मंजूर आहे , त्या व्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नसल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत . तसेच सदर खर्चाचा प्रगती अहवाल मासिक निधी विवरणपत्रानुसार संबंधित अधिकाऱ्यांने लेखाशिर्षनिहाय कोषागार प्रमाणक क्र. व दिनांकासह दरमहा 10 तारखेपर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
वितरीत करण्यात आलेल्या तरतुदीमधून फक्त नियमित वेतन अदा करण्यात यावेत व इतर कोणतेही देयके अदा करु नयेत असे नमुद करण्यात आलेले आहेत .
या संदर्भात राज्य शासनांच्या प्राथमिक शिक्षण संचालनालय मार्फत दिनांक 20 मे 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.