लाईव्ह मराठी पेपर , बालाजी पवार : राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांच्या माहे मे 2023 महिन्याचे वेतन स्थगिती करण्याबाबत प्रशासनाकडून , मोठी कारवाई करण्यात आलेली आहे . या संदर्भात जिल्हा प्रशासनाकडून दिनांक 26 मे 2023 रोजी आदेशही निर्गमित करण्यात आले आहेत .
शालेय विद्यार्थ्यांचे आधार वैध करण्याचे काम असमाधानकारक असल्याने वेतन स्थगित करणे बाबत जिल्हा परिषद नांदेड कार्याकडून आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे .यामध्ये नमूद करण्यात आली आहे की शालेय विद्यार्थ्यांचे मागील सहा महिन्यापासून दररोज आधार वैध असल्याबाबत रिपोर्ट देण्यात येत असून वारंवार आधार वैध करण्याबाबत , सूचना जिल्हा परिषद नांदेड कार्यालयाकडून देण्यात येत आहेत . या संदर्भात दिनांक 24 मे 2023 रोजी झालेल्या बैठकीमध्ये सूचना देखील देण्यात आल्या होत्या .
सदर बैठकीतील सूचनेनुसार आधार वैध असल्याबाबत , नोटीस देण्यात आली आहे . सद्यस्थितीमध्ये नांदेड जिल्हा परिषद अंतर्गत केवळ 14 शाळांचे आधार शंभर टक्के पूर्ण झाले आहेत . तर 177 शाळांचे आधार वैध 95 ते 99.99% काम झाले आहे . तर 246 शाळांचे काम अद्याप पर्यंत 95% पेक्षा आधार वैध कमी आहे .
हे पण वाचा : राज्य कर्मचाऱ्यांना DA वाढीस वित्त विभागाची मंजुरी !
ज्या शाळांचे आधार वैधचे प्रमाण 95 टक्के पेक्षा कमी आहे अशा शाळांचे माहे मे 2023 चे वेतन शंभर टक्के आधार वैध होईपर्यंत स्थगित ठेवण्यात येईल , असे आदेश देण्यात आले आहेत .वेतन विलंबास संबंधित मुख्याध्यापक जबाबदार असतील असे आदेश देण्यात आले आहे .
सदर खालील आदेशामध्ये नमूद शाळांना मे महिन्याचे वेतन अदा करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून आधार चे काम समाधानकारक असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय , वेतन अदा करण्यात येणार नाही . असे आदेशीत करण्यात आलेले आहेत .या संदर्भात जिल्हा परिषद नांदेड कार्यालयाकडून निर्गमित करण्यात आलेला सविस्तर आदेश डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे !
आपण जर शासकीय निमशासकीय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी त्याचबरोबर पेन्शनधारक असाल तर खालील व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा !