Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , बालाजी पवार : माहे मे 2023 चे वेतन देयके करतांना करावयाची कार्यवाही बाबत अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .यांमध्ये नमुद करण्यात आले आहे कि , ज्या कर्मचाऱ्यांना PRAN NUMBER अद्याप पर्यंत मिळालेले आहेत त्यांची माहे मे 2023 चे वेतनामधून नियमित NPS कपात करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .

तसेच जे एनपीएस कर्मचारी या महिन्यात सेवानिवृत्त होत असतील त्यांचे एनपीएस वर्गणी व शासन हिस्सा कपात करण्यात येवू नये असे आदेश देण्यात आलेले आहेत . तसेच माहे मे 2023 पासून ज्या कर्मचाऱ्यांना वित्त विभाग कडुन GPF क्रमांक मिळालेला नाही त्यांचे GPF कपात करण्यात येवू नये असे आदेशित करण्यात आले आहेत .तसेच आंतरजिल्हा बदली होवून कार्यमुक्त झालेल्या शिक्षक यांचे वेतन हे पंचायत समिती स्तरावरुन ज्या दिवशी कार्यमुक्त झाले त्या दिवशी पर्यंत सदर शिक्षकांचे वेतन अदा करणे या सूचनेचे कटाक्षाने पालन करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .

आंतरजिल्हा बदली होऊन कार्यमुक्त झालेल शिक्षक यांचे वेतन हे पंचायत स्तरावरुन ज्या दिवशी कार्यमुक्त झाले त्या दिवशी पर्यंत सदर शिक्षकांचे वेतन अदा करण्याच्या सुचनेचे कटाक्षाने पालन करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .तसेच माहे मे 2023 मध्ये ऑनलाईन जिल्हा अंतर्गत बदलीने कार्यमुक्त होणाऱ्या सर्व शिक्षकांचे मे 2023 या संपुर्ण महिन्यांचे वेतन हे बदली पुर्वीच्या शाळेवरुनच अदा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .

हे पण वाचा : सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% पार गेल्यास लागू होणार नवा वेतन आयोग !

सन 2022-23 या आर्थिक वर्षांमधील प्रलंबित असलेले वेतन हे सन 2023-24 मध्ये शालार्थ प्रणालीमधून अदा करणे शक्य होणार नाही , यानंतर कोणत्याही शिक्षकांचे प्रलंबित वेतन ब्रोकन कालावधी मधून जिल्हा पुर्व परवानगीने टाकण्यात येवू नये असे आदेशित करण्यात आलेले आहेत .तसेच प्रलंबित वेतन अदा करावयाचे असल्यास प्रथम गटशिक्षणाधिकारी / हायस्कुल मुख्याध्यापक यांचे स्वाक्षरीने जिल्हा कार्यालयास पत्र द्यावे लागेल व जिल्हा कार्यालयाने सदर बाबतीत परवानगी दिल्यानंतरच प्रलिंबित वेतन BROKEN PERIOD मधुन टाकण्यात येईल .

या संदर्भातील माहे मे 2023 चे वेतन देयके सादर करणेबाबतचे दि.15 मे 2023 रोजीचे सविस्तर शासन परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता .

शासकीय कर्मचारी विषयक , नोकर पदभरती , तसेच इतर चालु घडामोडींच्या अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *