लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनांकडुन मे महिना अखेर दि.31 मे 2023 रोजी शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून शासन निर्गमित करुन राज्यातील कर्मचाऱ्यांना माहे मे महिन्यांच्या वेतन त्याचबरोबर इतर देयकांसाठी निधींची उपलब्धता करुन देण्यात आलेली आहे .
शालेय शिक्षण विभाग अंतर्गतर कार्यरत नगर पालिका , जिल्हा परिषदांचे शाळा ,तसेच अशासकीय शिक्षणशास्त्र कनिष्ठ महाविद्यालये , प्राथमिक शाळा ,अशाासकीय माध्यमिक शाळा , कनिष्ठ महाविद्यालये , तसेच स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत कार्यरत शाळा , केंद्रीय प्राथमिक शाळा मधील आस्थापनेरील कर्मचारी वेतन व इतर बाबींसाठी आवश्यक निधींची उपलब्धता सदर शासन निर्णयानुसार करुन देण्यात आलेली आहे .
सदर अनुदान वितरण करण्यासाठी सन 2023-24 या आर्थिक वर्षात वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे . सदर अनुदान वितरण करताना , वित्त विभागांकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या नियमांचे पालन करण्याची जबाबदार संबंधित नियंत्रक अधिकारी यांच्यावर असणार आहे .सदर अनुदानांमध्ये कर्मचारी वेतन , तसेच इतर अग्रिमे , इतर देयके इ. बाबींकरीता अनुदान उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत .
महीना अखेर राज्य शासनांकडून वेतन व इतर देयके ( वैद्यकीय बिल , फरक , भत्ते , इतर देयके ) अदा करण्यासाठी अनुदाना उपलब्ध करुन दिल्याने , सदर शासन निर्णयांमध्ये नमुद कर्मचाऱ्यांचे माहे मे महिन्यांचे वेतन वेळेत होणार आहेत .सदर वेतन अनुदान बाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दि.31 मे 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे .
आपण जर शासकीय , निमशासकीय कर्मचारी तसेच अनुदानित शाळेतील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी व पेन्शनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !