Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee March Month Payment New Update ] : राज्यातील कर्मचाऱ्यांचे माहे मार्च पेड इन एप्रिल 2024 वेतन देयक संदर्भात राज्य शासनांच्या शिक्षण आयुक्तालय मार्फत दिनांक 27 मार्च 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहेत .

सदर परिपत्रकानुसार शिक्षण आयुक्तालयाचे प्रशासन अधिकारी ( आस्थापना ) यांच्या मार्फत राज्यातील सर्व शिक्षण संचालक प्राथमिक ,माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय प्रति परिपत्रक सादर करण्यात आलेले आहेत .. सदर परिपत्रकांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , रमजान ईद व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मार्च 2024 चे नियमित पगार दिनांक 05 एप्रिल 2024 पर्यंत करणेबाबत निवेदनाची कार्यवाही करणेबाबत सूचित करण्या आलेले आहेत .

सदर परिपत्रकांमध्ये नमुद करण्यात आलेले आहे कि , मा.श्री.श्रीकांत गोविंदराव देशपांडे , माजी विधान परिषद सदस्य यांच्या दिनांक 20 मार्च 2024 रोजीच्या निवेदनानुसार , रमजान ईद व डॉ.बाबासाहेबर आंबेडकर जयंती निमित्त नियमित पगार दिनांक 05 एप्रिल 2024 पर्यंत करण्याबाबत क्षेत्रीय स्तरावर निर्देश देण्याबाबत..

 तसेच ज्या जिल्ह्याचे पगार वेळेवर  होणार नाहीत तेथील अधिक्षक , वेतन पथक यांच्यावर कार्यवाही करण्याचे आदेश सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक यांना होणेबाबतच्या मागणीच्या अनुषंगाने यथानियम कार्यवाही करण्याचे व संबंधितांना कळविण्यसाचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

या संदर्भात शिक्षण आयुक्तालय मार्फत दिनांक 27 मार्च 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेले सविस्तर शासन परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *