Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [state employee mahagai Bhatta vadh update ] : राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी तसेच पेन्शन धारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव 53 टक्के प्रमाणे महागाई भत्ता लाभ जानेवारी पेड इन फेब्रुवारी वेतन /पेन्शन देयकासोबत दिला जाणार आहे , या संदर्भात महत्वपुर्ण अपडेट समोर येत आहे , ती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
डी.ए वाढीबाबत राज्य सरकारला निवेदने : राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव 3 टक्के महागाई भत्ता लागु करणेबाबतचा निर्णय राज्य सरकारने अद्याप न घेतल्याने , राज्यातील विविध कर्मचारी संघटना मार्फत राज्य सरकारला निवेदने देवून तात्काळ वाढीव महागाई भत्ता फरकासह लागु करण्याचे निवेदन राज्याचे मा.मुख्यमंत्री यांना दिले आहेत .
वाढीव 3 टक्के महागाई भत्ताचा लाभ जुलै 2024 पासुन : राज्य कर्मचारी तसेच पेन्शन धारकांना वाढीव 3 टक्के महागाई भत्ताचा लाभ हा डी.ए फरकास दिनांक 01 जुलै 2024 पासुन दिला जाणार आहे . यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना एकुण महागाई भत्ता हा 50 टक्के वरुन 53 टक्के इतका होणार आहे .
डी.ए वाढीबरोबरच HRA मध्ये देखिल होणार वाढ : राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीबरोबरच घरभाडे भत्ता मध्ये देखिल वाढ होणार आहे . सदरची वाढ ही राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून नियोजित शासन निर्णयानुसार घरभाडे भत्ता मध्ये वास्तव्याच्या ठिकाणानुसार 10 टक्के , 20 टक्के व 30 टक्के अशी वाढ होणार आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.