लाईव्ह मराठी पेपर , बालाजी पवार : केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये जानेवारी 2023 पासून 4 टक्के वाढ केल्यानंतर विविध राज्य सरकारने डी. ए वाढीबाबत मोठा निर्णय घेतले आहेत . यांमध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने देखिल राज्यातील दुय्यम न्यायालयातील अधिकारी / पेन्शनधारकांना 4 टक्के डी.ए जानेवारी 2023 पासून वाढ करणेबाबत यापुर्वीच शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .
राज्य शासनांकडून राज्यातील सर्वच अधिकारी कर्मचाऱ्यांना एकाच वेळेस डी.ए वाढ लागु करण्यात येत नाहीत , यामध्ये महाराष्ट्र राज्यातील भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांना डी.ए वाढीबाबत वेगळा शासन निर्णय निर्गमित करण्यात येत असतो , तसेच राज्यातील सेवानिवृत्त पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना वेगळ्या शासन निर्णयान्वये डी.ए वाढ लागु करण्यात येते ,तर असुधारित वेतनश्रेणींमध्ये वेतन / पेन्शन धारण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना डी.ए वाढ करणेबाबत वेगळा शासन निर्णय निर्गमित करण्यात येते .
यानुसार विधी व न्याय विभागांकडून दि.06 जून 2023 रोजी महागाई भत्तामध्ये चक्क 9 टक्के वाढ करणेबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालय व्य विभागाचे कार्यालयीन ज्ञापन क्र .1/03(1)/2008-E.II(B) दि.10.04.2023 च्या प्रत नुसार महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील न्यायिक अधिकाऱ्यांसदर्भात माहीती व योग्य ती कार्यवाही करण्याचे नमुद करण्यात आलेले आहेत .
सविस्तर महागाई भत्ता वाढ GR पाहा
यामध्ये नमदु करण्यात आलेले आहेत कि , केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या नमुद कार्यालयीन ज्ञापनानुसार , दि.01 जानेवारी 2023 पासून लागू करण्यात आलेली 9 टक्के ( 212 टक्के ते 221 टक्के ) महागाई भत्यातील वाढ व ज्ञापनात नमुद इतर तरतुदी महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील दि.01 जानेवारी 2016 पुर्वी सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सदर शासन निर्णयान्वये लागु करण्यात येत आहेत .
त्यानुसार आता महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील दि.01.01.2016 पुर्वी सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना दि.01 जानेवारी 2023 पासून 221 टक्के दराने महागाई भत्ता अनुज्ञेय असणार आहेत , सदर महागाई भत्त्याच्या वाढीची रक्कम रोखीने अदा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .
सदर 9 टक्के महागाई भत्ता वाढीसंदर्भातील दि.06 जून 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय ( GR ) डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक कर्मचारी असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !