लाईव्ह मराठी पेपर , प्रणित पवार : राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरांमध्ये दिनांक 01 जानेवारी 2023 पासुन सुधारणा करणेबाबत अखेर राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 30.06.2023 रोजी GR ( SHASAN NIRNAY) निर्गमित करण्यात आलेला आहे .
राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पुर्ण कालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरांमध्ये सुधारणा करण्याचा प्रश्न राज्य शासनांच्या विराधीन होता , यानुसार राज्य शासन आता असे आदेश देत आहे कि , दिनांक 01 जानेवारी 2023 पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मुळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 38 टक्के वरुन 42 टक्के करण्यात आला आहे .
सदर महागाई भत्ता वाढ दिनांक 01 जानेवारी 2023 ते दिनांक 31 मे 2023 या कालावधीतील थकबाकीसह माहे जुन 2023 च्या वेतनासोबत रोखपीने देण्यात यावी असे आदेश देण्यात आलेले आहेत . तसेच महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्या संदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याचप्रमाणे यापुढेही लागु असणार आहेत , असे आदेश देण्यात आलेले आहेत .
यावर होणारा खर्च हा संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशिर्षा खाली खर्ची टाकण्यात येतात , त्या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकुन त्याखालील मंजुर अनुदानातुन भागविण्याचे आदेश देण्यात आलेले आहत . तसेच अनुदानाप्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित प्रमुख लेखाशिर्षाखालील ज्या उपलेखाशीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो , त्या उप लेखाशीर्षाखाली हा खर्ची टाकण्यात यावेत असे आदेश सदर शासन निर्णयान्वये देण्यात आलेले आहेत .
सदर 04 टक्के डी.ए वाढ संदर्भात वित्त विभागांकडून दिनांक 30 जुन 2023 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..
आपण जर शासकिय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर ,Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !