लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र शासन सेवेतील शासकीय , निमशासकीय कर्मचारी तसेच इतर पात्र असणारे कर्मचारी व पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 पासून 4 टक्के वाढीव महागाई भत्ता लागु करण्यात येणार आहेत , या संदर्भात महागाई भत्ता वाढीच्या प्रस्तावास वित्त विभागांकडून अखेरचा शिक्कामोर्तब करण्यात आला आहे .
केंद्र सरकारने जानेवारी 2023 पासून चार टक्के महागाई भत्तामध्ये वाढ केल्यानंतर , केंद्र सरकारच्या धर्तीवर राजस्थान , हिमाचल प्रदेश , तामिळनाडू , बिहार , मध्य प्रदेश , गुजरात राज्य सरकारने महागाई भत्ता मध्ये वाढ लागु करण्यात आली आहे .परंतु महाराष्ट्र राज्य शासनांकडून काही प्रशासकीय कारणास्तव राज्य कर्मचाऱ्यांच्या डी.ए वाढीच्या प्रस्तावास विलंब होत आहे .
नुकतेच राज्य कर्मचारी संघटनांनी दिलेल्या निवेदनानुसार , गुजरात राज्य सरकारने 8 टक्के डी.ए वाढ केल्याप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये देखिल दोन टप्यातील ( जानेवारी 2023 मधील 4 टक्के आणि दुसऱ्या टप्पा जुलै 2023 मधील 4 टक्के वाढ ) 8 टक्के महागाई भत्ता वाढविण्यात यावी . अशी मागणी करण्यात आलेली आहे .राज्य कर्मचाऱ्यांना नेहमीच डी.ए वाढीचा लाभ हा विलंबानेच मिळत असल्याने , कर्मचाऱ्यांमध्ये मोठी नाराजगी नेहमीच नाराजगी दिसून येते .
परंतु राज्य सरकारडून राज्यातील सर्व शासकीय , निमशासकीय ( जिल्हा परिषदा ) कर्मचारी व इतर पात्र कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीधारक कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 पासून डी.ए फरकासह 4 टक्के म्हणजेच एकुण 42 टक्के प्रमाणे महागाई भत्ता लागु करणेबाबत या महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यात शासन निर्णय निर्गमित करण्यात येणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे .
आपण जर शासकीय , निमशासकीय कर्मचारी तसेच शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी व सेवानिवृत्त पेन्शनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !