लाईव्ह मराठी पेपर ,संगीता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील डी.ए वाढीबाबतची प्रतिक्षा अखेर संपली असून , डी.मध्ये वाढ करणेबाबतचा अधिकृत्त शासन निर्णय दि.19 मे 2023 रोजी विधी व न्याय विभागाकडून निर्गमित करण्यात आलेला आहे . त्याचबरोबर सदरचा वाढीव महागाई भत्ता हा दि.01 जानेवारी 2023 पासून डी.ए फरकासह लागु करण्यात आलेला आहे .
केंद्र सरकारने जानेवारी 2023 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तांमध्ये 4 टक्के वाढ करण्याची घोषणा केली होती , या अनुषंगानेच राज्यातील कर्मचाऱ्यांना महागाई भत्तांमध्ये वाढ करण्याची तरतुद राज्य शासनांकडून करण्यात आलेली होती . यामुळे केंद्र सरकारच्या वित्त मंत्राकडून नमुद करण्यात आलेल्या ज्ञापनानुसार सदर वाढीव डी.ए लागु करण्यात आलेली आहे .
याच कर्मचाऱ्यांना लागु करण्यात आली डी.ए वाढ – महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील सर्वच सरकारी कर्मचाऱ्यांना अद्याप 42 टक्के डी.ए वाढ लागु करण्यात आलेली नाही तर राज्यातील दुय्यम न्यायालयांमध्ये कार्यरत अधिकाऱ्यांना त्याचबरोबर सेवानिवृत्त झालेल्या न्यायिक अधिकाऱ्यांना सदरची महागाई भत्ता वाढ लागु करण्यात आलेली आहे .
या शासन निर्णयांनुसार वरील नमुद करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 पासून डी.ए दर 38 टक्के वरुन 42 टक्के करण्यात आलेले आहेत . या निर्णयामुळे सदर कर्मचाऱ्यांच्या / सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वेतन / पेन्शन मध्ये मोठी वाढ होणार आहे .
सदर 4 टक्के डी.ए वाढ संदर्भातील सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्याकरीता खालील लिंकवर क्लिक करावे .
शासकीय कर्मचारी , नोकर पदभरती व इतर बातमी अपडेट करिता whatsapp Group जॉईन करा !