Spread the love

लाईव्ह मराठी पेपर संगीता पवार प्रतिनिधी : सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये दरवर्षी जानेवारी व जुलै महिन्यात वाढ करण्यात येत असते ,सध्या केंद्र शासनाने जानेवारी 2023 पासून चार टक्के DA वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे . केंद्र सरकारच्या सरकारच्या निर्णयानंतर अनेक राज्य सरकारने ते DA वाढीबाबत , मोठा निर्णय घेण्यात आला आहे .

यामध्ये तमिळनाडू , हिमाचल प्रदेश , राजस्थान ,आसाम या राज्य शासनाने केंद्र शासनाच्या निर्णयानंतर लगेचच डी. ए वाढीबाबत निर्णय घेण्यात आली आहेत . याच अनुषंगाने गुजरात राज्य सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये मोठी वाढ करणेबाबत निर्णय घेण्यात आला आहे .

महागाई भत्ता यामध्ये 8% वाढ : गुजरात राज्य सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये चक्क 8% टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . या संदर्भात शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आला आहे , परंतु ही DA वाढ जानेवारी व जुलै अशी दोन टप्प्यातील असणार आहे . म्हणजेच जानेवारी 2023 मधील चार टक्के वाढ ,त्याचबरोबर जुलै 2023 मधील 4% टक्के वाढ अशी एकूण 8% टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे .

गुजरात राज्य सरकारने महागाई भत्त्यामध्ये आठ टक्क्यांची वाढ केल्याने गुजरात राज्यातील तब्बल साडेनऊ लाख सरकारी कर्मचारी त्याचबरोबर पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे . गुजरात राज्याचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी DA मध्ये वाढ करून , राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे .

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य कर्मचारी संदर्भात , निर्गमित झाला अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय ! दि.26.05.2023

केंद्र सरकारच्या धर्तीवर देशातील राज्य सरकारकडून डीए वाढीबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येत आहेत , परंतु महाराष्ट्र राज्य सरकारकडून डी. ए वाढिबाबतचा निर्णय अद्याप पर्यंत प्रलंबित आहे , सदर डीए वाढ राज्य कर्मचाऱ्यांना माहे जून महिन्याच्या वेतन देयकासोबत दिला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे .

आपण जर सरकारी – निमसरकारी ,पेन्शनधारक कर्मचारी असाल तर Whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *