Spread the love

लाईव्ह मराठी पेपर बालाजी पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीबाबत अखेर मोठी आनंदाची गुड न्युज समोर आलेली आहे . ती म्हणजे केद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्यातील कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के डी.ए माहे जानेवारी 2023 पासुन पुर्वलक्षी प्रभावाने लागु करणेाबाबत विध व न्याय विभागांकडून महत्वपुर्ण शासन निर्णय दि.19 मे 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे .

केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालय , व्यय विभागाचे कार्यालयीन ज्ञापन क्रमांक 01/01/2023 E दिनांक 03.04.2023 ची प्रत महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील अधिकाऱ्यां संदर्भात माहीती व योग्य त्या कार्यवाहीसाठी अग्रेषित करण्यात आलेली आहे .

केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या उपरोक्त नमुद कार्यालयीन ज्ञापनानुसार दि.01 जानेवारी 2023 पासून लागु करण्यात आलेली 4 टक्के ( 38 टक्के ते 42 टक्के ) महागाई भत्त्यातील वाढ व ज्ञापनात नमुद इतर तरतुदी महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील न्यायिक अधिकाऱ्यांना तसेच सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सदर शासन निर्णयान्वये लागु करण्यात येत आहेत .

सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करा

त्याचबरोबर आता महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील न्यायिक अधिकाऱ्यांना तसेच सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना दि.01 जानेवारी 2023 पासून 42 टक्के दराने महागाई भत्ता अनुज्ञेय करण्यात आलेले आहेत . सदर महागाई भत्ता वाढीची रक्कम रोखीने अदा करण्याचे आदेश सदर निर्णयान्वये देण्यात आलेले आहेत . यामुळे सदर वरील नमुद कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची मोठी रक्कम प्राप्त होणार आहे .

या संदर्भातील राज्य शासनांच्या विधी व न्याय विभागांकडून दि.19 मे 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय ( शासन निर्णय सांकेतांक क्रमांक – 202305191151383512 ) डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे .

शासन निर्णय पाहा

शासकीय कर्मचारी , नोकर पदभरती व इतर बातमी अपडेट करिता whatsapp Group जॉईन करा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *