लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील शासकीय , निमशासकीय ( जिल्हा परिषदा ) , अनुदानित शिक्षक – शिक्षकेत्तर कमर्चारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव 4 टक्के महागाई भत्ता लागु करणेबाबत , राज्य शासनांच्या कॅबिनेट मंत्रीमंडळाची बैठक आयोजित करण्यात येणार आहे .
महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील वरील नमुद सर्व कर्मचारी / पेन्शनधारकांना माहे जानेवारी 2023 पासून वाढीव 4 टक्के लाभ अनुज्ञेय करणेबाबत , राज्य शासनांकडून जुन महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यात कॅबिनेट मंत्रीमंडाळाची बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहेत . सदर बैठक ही राज्याचे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असून वित्त विभागांकडून तयार करण्यात आलेल्या डी.ए वाढीच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात येणार आहेत .
महागाई भत्त्यांमध्ये चार टक्के होणार वाढ : राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यांमध्ये माहे जानेवारी 2023 पासून डी.ए फरकासह चार टक्के वाढ करण्यात येणार आहे . केंद्र सरकारच्या निर्णयानंतर केंद्र सरकारच्याच धर्तीवर 4 टक्के डी.ए वाढ करण्यात येणार आहे .सदचा वाढीव महागाई भत्ता हा राज्यातील सर्वच अधिकारी / कर्मचाऱ्यांना लागु करण्यात येणार आहे .
जुन महिन्यांच्या वेतन / पेन्शन देयकासोबत सदर वाढीव चार टक्के डी.ए अदा करणेबाबत अधिकृत्त शासन निर्णय जुन महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यात कॅबिनेट बैठकीचे आयोजन करुन निर्णय घेतला जाणार असल्याची खात्रीलायक बातमी समोर येत आहे .वित्त विभागांकडून डी.ए वाढीचा प्रस्ताव यापुर्वीच तयार करण्यात आला आहे . सदर महागाई भत्ता ( DA ) वाढीच्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतन देयक तसेच पेन्शन देयकांमध्ये मोठी वाढ होणार आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !