राज्य कर्मचाऱ्यांना खुशखबर : जुलै महिन्यांत मिळणार वेतनात मोठी वाढ , शिंदे सरकार घेणार मोठा निर्णय !

Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , बालाजी पवार : राज्य शासन सेवेतील कार्यरत शासकीय , निमशासकीय ( जिल्हा परिषदा ) , अनुदानित शाळेतील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची आनंदाची बातमी समोर येत आहे .केंद्र सरकारने नुकतेच घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने राज्य शासनांकडून मोठा निर्णय घेण्यात येणार आहे .

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 पासून महागाई भत्ता ( DA ) मध्ये वाढ लागु करण्यात आलेली आहे .या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना माहे 01 मे कामगार दिन दिनांदिवशी लागु करण्यात येणार असल्याची बातमी समोर आली होती . शिंदे सरकारचा सत्तासंघार्षाचा निकाल प्रंलबित होता म्हणून डी.ए वाढीस विलंब करण्यात येत होते .

केंद्र सरकारच्या निर्णयानंतर लगेच राजस्थान राज्य सरकारने डी.ए वाढीबाबतचा लगेच निर्णय घेतला परंतु महाराष्ट्र राज्य सरकारने अद्याप पर्यंत निर्णय घेतला नाही . यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांमध्ये अद्याप पर्यंत नाराजगी आहे , परंतु ही नाराजगी लवकरच नाहीशी होणार आहे . राज्यातील कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार प्रमाणे डी.ए वाढीसाठी वारंवार पाठपुरावा करीत आहेत .

राज्य कर्मचाऱ्यांना मे महिन्यांपासून डी.ए वाढ लागु करण्याची आश लावण्यात लावली असली तरी राज्य कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष महागाई भत्ता वाढ ही माहे जुलै महिन्यांपासून डी.ए फरकासह लागु करण्यात येणार असल्याची बातमी समोर येत आहे .जुलै महिन्यांत राज्य सरकारला डी.ए वाढ लागु करावीच लागणार आहे कारण जुलै मध्ये दुसऱ्यांदा डी.ए वाढ करण्यात येते व केंद्र सरकारकडून जुलैची डी.ए वाढीची घोषणा करण्यात येत असते .

DA 42% होणार : महराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना अदा करण्यात आल्याप्रमाणे 4 टक्के डी.ए वाढ म्हणजेच एकुण 42 टक्के महागाई भत्ता माहे जानेवारी 2023 पासून डी.ए फरकासह अदा करण्यात येणार आहे .

Leave a Comment