कर्मचाऱ्यांना खुशखबर : महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना 4% वाढीसाठी मंत्रीमंडळ बैठकीचे आयोजन !

Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील शासकीय , निमशासकीय ( यांमध्ये जिल्हा परीषदा ) तसेच अनुदानित शाळांमध्ये कार्यरत शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , पेन्शनधारक कर्मचारी व इतर पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर तसेच राज्य शासनांने लागु केलेल्या न्यायिक अधिकाऱ्यांच्या धर्तीवर चार टक्के महागाई भत्ता वाढीचा निर्णय घेण्यासठी मंत्रीमंडळ बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहेत .

4 टक्के डी.ए वाढीबाबतचा वित्त विभागांकडून प्रस्ताव तयार – सुत्रांनुसार महाराष्ट्र राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून केंद्र सरकारच्या धर्तीवर चार टक्के म्हणजेच 42 टक्के प्रमाणे डी.ए वाढीबाबतचा प्रस्ताव वित्त विभागांकडून तयार करण्यात आलेला असून ,सदरची वाढ माहे जानेवारी 2023 पासूनच लागु करण्यात येणार आहे , सदर निर्णय राज्य शासनांकडून मंत्रीमंडळ बैठकीचे आयोजन करुन निर्णय घेण्यात येणार आहे .

देशातील बऱ्याच राज्य सरकारने 4 टक्के डी.ए वाढीबाबतचा निर्णय घेतल्याने , महाराष्ट्र राज्यातील कर्मचारी संघटनांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून डी.ए वाढ तात्काळ लागु करण्याची मागणी करण्यात आली आहे . यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच मंत्रीमंडळ बैठकीचे आयोजन करुन सदर 4 टक्के वाढीबाबतचा सकारात्मक निर्णय घेण्यात येणार आहे .

मिडीया रिपोर्टनुसार , राज्यातील कर्मचाऱ्यांना चार टक्क्के डी.ए वाढ ही जुन महिन्यांच्या वेतन / पेन्शन देयकासोबत जानेवारी ते मे महिन्यांच्या डी.ए फरक रक्कमासह लागु करण्यात येणार आहे . याबाबत मंत्रीमंडळाची बैठक पुढच्या महिन्यातील शेवटच्या आठवड्यात घेण्यात येणार असल्याची माहीती समोर येत आहे .

सरकारी कर्मचारी असाल तर , Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Comment