लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे , ती म्हणजे केंद्र सरकारप्रमाणे डी.ए वाढीचा लाभ लवकरच राज्य अनुज्ञेय करण्यात येणार आहेत . राज्य कर्मचाऱ्यांच्या डी. वाढीसंदर्भात महाराष्ट्र राज्य राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून प्रस्ताव तयार करण्यात आली असल्याची मोठी बातमी समोर येत आहे .
महागाई भत्ता मध्ये चार टक्क्यांची वाढ : महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांच्या वेतनांमध्ये चार टक्क्यांची वाढ ही माहे जानेवारी 2023 पासूनच करण्यात येणार आहे . यामुळे माहे जानेवारी , फेब्रुवारी , मार्च , एप्रिल , मे अशा पाच महिन्यांच्या डी.ए फरकासह चार टक्के डी.ए माहे जुन महिन्यांच्या वेतन देयकासोबत रोखीने अदा करण्यात येणार आहे .
सहाव्या वेतन आयोगानुसार असुधारित वेतनश्रेणीमध्ये वेतन धारण करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यांमध्ये 9 टक्यांची वाढ करण्यात येणार आहे .तसेच असुधारित वेतनश्रेणीप्रमाणे पेन्शन धारण करणाऱ्या निवृत्तीवेतनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांच्या महागाई भत्त्यांमध्ये देखिल माहे जानेवारी 2023 पासून 9 टक्क्यांची वाढ करण्यात येणार आहे .सातव्या वेतनानुसार वेतनधारण करणाऱ्यांच्या डी.ए मध्ये 4 टक्के तर सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या कर्मचारी / पेन्शनधारकांना 9 टक्के डी.ए वाढ जून महिन्याच्या देयकासोबत लागू करण्यात येणार आहे .
या संदर्भात अधिकृत्त शासन निर्णय माहे जुन महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यात निर्णय होणार असल्याची खात्रीलायक मोठी आनंदाची अपडेट समोर येत आहे .यामुळे राज्य सरकारी कर्मचारी / पेन्शनधारकांच्या जुन महीन्यांच्या वेतन / पेन्शन देयकांमध्ये मोठी वाढ होणार आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !