Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee mahagai Bhatta ] : राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता , डी.ए थकबाकीसह देणेबाबत , मुख्यमंत्र्यांसह वित्तमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहेत .
केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील शासकीय तसेच इतर पात्र अधिकारी / कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शन धारकांना माहे जुलै 2024 पासुन डी.ए थकबाकीसह वाढीव 3 टक्के महागाई भत्ता देण्याची मागणी राजपत्रित अधिकारी महासंघाकडून करण्यात आलेली आहे .
या संदर्भातील निवेदन महसंघाचे पदाधिकारी ग.दि.कुलथे यांच्याकडून राज्याचे मा.मुख्यमंत्री तसेच राज्याचे वित्तमंत्री अजित पवार यांना देण्यात आलेले आहेत . सदर निवेदनामंध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिनांक 01 जुलै 2024 पासून वाढीव 3 टक्के महागाई भत्ता लागु करण्यात आला आहे .
यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना एकुण 53 टक्के दराने महागाई भत्ता लागु झाला आहे . याशिवाय राज्यातील आखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना देखिल सदर वाढीव महागाई भत्ता यापुर्वीच लागु करण्यात आलेली आहे .
राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव महागाई भत्ता देय असल्याचे प्रचलित धोरण असल्याने , केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव 3 टक्के महागाई भत्ता तसेच घरभाडे भत्ता व तद्नुषंगिक इतर भत्ते थकबाकीसह देण्याचा निर्णय राज्य शासनांकडून तात्काळ देण्याची मागणी सदर निवेदनांमध्ये करण्यात आलेली आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.