लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : 7th Pay Commission : केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये 4 टक्के वाढ केल्यानंतर देशातील राज्य सरकारने डी.ए 3 ते 4 टक्क्यांची वाढ लागू करण्यात आली आहे .केंद्र सरकारच्या जानेवारी 2023 चे 4 टक्के वाढीच्या निर्णयानंतर कोणत्या राज्य सरकारने किती टक्के डी.ए वाढ करण्यात आली याबाबत सविस्तर माहीती पुढील प्रमाणे पाहुयात ..
केंद्र सरकारने माहे जानेवारी 2023 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना 4 टक्के डी.ए वाढ लागु केल्याने , केंद्रीय कर्मचाऱ्यांचा एकुण महागाई भत्ता ( DA ) हा 38 टक्के वरुन 42 टक्के पर्यंत जावून पोहोचला आहे .याच केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील इतर राज्य सरकारने महागाई भत्तांमध्ये 3 टक्के ते 4 टक्क्यांची वाढ लागु करण्यात आलेली आहे .
केंद्राप्रमाणे या राज्य सरकारने लागु केली 4 टक्के डी.ए वाढ : केंद्र सरकारच्या धर्तीवर तामिळनाडू , उत्तर प्रदेश , बिहार राज्य सरकारने महागाई भत्तांमध्ये 4 टक्क्यांची वाढ लागू करण्यात आली आहे , यामुळे सदर राज्यातील कर्मचाऱ्यांचा एकुण महागाई भत्ता केंद्र सरकारप्रमाणे 38 टक्के वरुन 42 टक्क्यांपर्यत जावून पोहोचला आहे .सदर डी.ए जानेवारी 2023 पासून डी.ए फरकासह लागू करण्यात आले आहेत .
या राज्य सरकारने 3 टक्के डी.ए वाढ लागू करण्यात आली – हिमाचल प्रदेश , आसाम आणि राजस्थान राज्य सरकारने केंद्र सरकारच्या डी.ए वाढीच्या निर्णयानंतर राज्य कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये 3 टक्क्यांची वाढ लागु करण्यात आली आहे .
महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना लागु होणार 4 टक्के डी.ए – केंद्र सरकारच्या डी.ए वाढीच्या निर्णयानंतर , महाराष्ट्र राज्य सरकाडून राज्य कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये 4 टक्के डी.ए वाढ लागु करण्यात येणार आहे , तसा राज्य शासनाच्या वित्त विभागांकडून प्रस्ताव देखिल तयार करण्यात आल्याची बातमी समोर येत आहे .
सरकारी कर्मचारी विषयक , नोकर पदभरती , इतर घडामोडींच्या अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !